क्रिकेटची अशीही काळी बाजू; 'या' 3 प्रकरणांमुळे बेचिराख झालेलं नाव

फिक्सिंगच्या तीन घटना ज्यामुळे क्रिकेटला पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन काही प्रमाणात बदलला.

Updated: Mar 10, 2022, 01:33 PM IST
क्रिकेटची अशीही काळी बाजू; 'या' 3 प्रकरणांमुळे बेचिराख झालेलं नाव title=

मुंबई : क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. हा खेळावर भारतीयाचं इतकं प्रेम आहे की, चाहत्यांकडून यासाठी पूजापाट देखील केले जातात. मात्र क्रिकेटच्या या जगतात अशा काही घटना आहेत ज्यामुळे या खेळाचं नाव खराब झालं. या खेळाला डाग लागला तो फिक्सिंगचा. अशाच फिक्सिंगच्या तीन घटना ज्यामुळे क्रिकेटला पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन काही प्रमाणात बदलला.

साल 2000मध्ये सर्वात मोठं फिक्सिंग

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यादरम्यान मॅच फिक्सिंगचं मोठं स्कँडल समोर आलं होतं. 2000 साली ही घटना समोर आली होती. याचा उलगडा भारतीय पोलिसांनी केला आहे. पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे, यामध्ये टीम इंडियातील 5 खेळाडू बुकींच्या संपर्कात होते. यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार मोहम्मद अझरूद्दीन आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हँसी क्रोनिए यांचा समावेश होता.

इंग्लंडमध्ये स्पॉट फिक्सिंग

2010 साली पाकिस्तानमध्ये इंग्लंड दौऱ्यावर असताना स्पॉट फिक्सिंग समोर आली होती. त्यावेळी पाकिस्तान क्रिकेट टीममधील मोहम्मद आमिर, मोहम्मद आसिफ आणि तत्कालीन कर्णधार सलमान बट्ट यांचा या फिक्सिंगमध्ये समावेश होता. एका स्टिंग ऑपरेशनमुळे ही घटना समोर येण्यास मदत झाली. यानंतर आयसीसीने या खेळाडूंवर काही वर्षांची बंदी घातली होती. 

आयपीएल 2013 मध्ये स्पॉट फिक्सिंग

आयपीएलचीही ही स्पॉट फिक्सिंग प्रत्येक चाहत्याच्या लक्षात असेल. 2013 च्या आयपीएलच्या राजस्थान रॉयल्समधील श्रीसंत, अंकित चव्हाण आणि अजित चंदोलिया यांना अटक करण्यात आली होती. इतकंच नव्हे तर चौकशी होईलपर्यंत राजस्थान रॉयल्सला देखील निलंबित करण्यात आलं होतं.