Tokyo Olympics 2020 | भारताची ऑलिम्पिकमध्ये विक्रमी कामगिरी, प्रथमच सर्वाधिक मेडल्सची कमाई

भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) नवा पराक्रम रचला आहे. यंदा भारताने पहिल्या तिन्ही क्रमांकाची पदक पटकावली आहेत.

Updated: Aug 7, 2021, 06:37 PM IST
 Tokyo Olympics 2020 | भारताची ऑलिम्पिकमध्ये विक्रमी कामगिरी, प्रथमच सर्वाधिक मेडल्सची कमाई

टोकिया : भारताचा टोकियो ऑलिम्पिकमधील (Tokyo Olympics 2020) शेवट गोड झाला आहे. भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) भारताला सुवर्ण पदक मिळवून दिल्याने शेवट गोड झाला आहे. यामुळे भारताला तब्बल 13 वर्षानंतर वैयक्तिक सुवर्ण पदक मिळालं आहे. याआधी 2008 च्या बिजिंग ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्राने भारताला पहिलवहिलं सुवर्ण मिळवून दिलं होतं. दरम्यान यंदाच्या या टोकियो ऑलिम्पिकमध्ये टीम इंडियाने पर्यायाने खेळाडूंनी पराक्रम रचला आहे. भारताने ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत पहिल्यांदा सर्वाधिक मेडल्सची कमाई करण्याचा कारनामा केला आहे. (Tokyo Olympics 2020 India record break performance Wining a total of 7 medals including gold  silver and bronze)  

भारताने  Tokyo Olympics 2020 मध्ये एकूण 7 पदकांची कमाई केली आहे. यामध्ये 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्य पदकांचा समावेश आहे. यामध्ये 6 वैयक्तिक तर 1 सांघिक पदकाचा समावेश आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्य पदक मिळवलंय. याआधी भारताने 2012 च्या ऑलिम्पिकमध्ये 6 पदकांची कमाई केली होती. पण यामध्ये केवळ  रौप्य आणि कांस्य पदकांचाच समावेश होता. मात्र यावेळेस भारताने नवा पराक्रम रचला आहे. यंदा भारताने पहिल्या तिन्ही क्रमांकाची पदक पटकावली आहेत.

कोणाला कशात पदक मिळालं?

नीरज चोप्रा (Neeraj Chopra) -  भालाफेक - सुवर्ण पदक (Golden Medel)
मीराबाई चानू (Mirabai Chanu) - वेटलिफ्टिंग- रौप्य पदक (Silver Medel)
रवीकुमार दहीया (RaviKumar Dahiya)-कुस्ती-सिल्वर (Silver Medel)
बजरंग पुनिया (Bajarang  Puniya) - कुस्ती- कांस्य (Bronze Medel)
पी व्ही सिंधु (P V Sindhu) बॅडमिंटन- कांस्य  (Bronze Medel)
लव्हलिना बोरगोई (Lovlina Borgohain) - बॉक्सिंग- कांस्य  (Bronze Medel)
भारत पुरुष हॉकी (Indians Mens Hockey Team) - कांस्य  (Bronze Medel)

खेळाडूंचं कौतुक 

दरम्यान भारताच्या खेळाडूंनी वैयक्तिक तसेच सांघिक पातळीवर पदकांची कमाई केल्याने त्यांचं सर्वच स्तरातून तोंडभरून कौतुक केलं जातंय. या खेळाडूंना स्थानिक सरकारसह केंद्र सरकारकडूनही बक्षिस जाहीर करण्यात आलंय. तसंच त्यांना क्लास वन दर्जाची नोकरी देण्याचंही आश्वासन देण्यात आलंय.