Tokyo Olympics 2020 | भावा कडक! बजरंग पुनियाचा धमाकेदार विजय, ब्रॉन्झ पदकाची कमाई

  बजरंग पुनियने (Wrestler Bajrang Punia)  दौलेत नियाझबेकोव्हला (Daulet Niyazbekov) 65 किलो वजनी गटात अस्मान दाखवलं.

Updated: Aug 7, 2021, 04:51 PM IST
Tokyo Olympics 2020 | भावा कडक! बजरंग पुनियाचा धमाकेदार विजय, ब्रॉन्झ पदकाची कमाई

टोकियो : टोकियो ऑलिम्पिकमधून (Tokyo Olympics 2020) भारतासाठी आनंदाची बातमी आली आहे. भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची वाढ झाली आहे. भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने (Wrestler Bajrang Punia) ब्रॉन्झ मेडल पटकावलं आहे. बजरंगने कझाकस्तानचा कुस्तीपटू  याचा 8-0 अशा एकतर्फी अंतराने पराभव केला आहे. बजरंगने दौलेत नियाझबेकोव्हला 65 किलो वजनी गटात अस्मान दाखवलं. बजरंगने हा सामना जिंकल्याने भारताने या टोकियो ऑलिम्पिकमध्ये 6 वं पदक पटकावलं आहे. (Tokyo Olympics 2020 Indian Wrestler Bajrang Punia wins Bronze medal in Mens Freestyle 65kg against Kazakhstans Daulet Niyazbekov by 8 0)

'जय' बजरंग, पुनियावर कौतुकाचा वर्षाव

दरम्यान बजरंगने ब्रॉन्झ पदक मिळवल्याने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. भारतीय चाहते उत्सुकतेने टीव्हीसमोर मेडलच्या अपेक्षेने बजरंग पुनियाचा सामना पाहत होते. बजरंगने भारतीयांची निराशा केली नाही. बजरंगने सुरुवातीपासून इंगा दाखवला. त्याने कझाकस्तानच्या पैलवानाला आपल्यावर हावी होऊन दिलेच नाही. बजरंगने एकतर्फी सामना जिंकला. बजरंगने पदक मिळवल्यानंतर भारतात जल्लोषाचं वातावरण आहे. त्याच्या घरी तर दिवाळीचं वातावरण निर्माण झालंय. गावकऱ्यांनी त्याच्या घराबाहेर एकच गर्दी केलीय. 

बजरंगला या ऐतिहासिक विजयासाठी त्याचं कौतुक केलं जातंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत बजरंगच कौतुक केलंय. तसेच विविध क्षेत्रातील दिग्गजांकडून त्याचं कौतुक केलं जातंय.