Tokyo Paralympics: शूटर अवनी लेखराचा थेट गोल्ड मेडलवर निशाणा

 टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताने गोल्ड मेडलची कमाई केली आहे.

Updated: Aug 30, 2021, 08:31 AM IST
Tokyo Paralympics: शूटर अवनी लेखराचा थेट गोल्ड मेडलवर निशाणा title=

मुंबई : टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताने गोल्ड मेडलची कमाई केली आहे. यंदाच्या वर्षीचं हे भारताचं पहिलं गोल्ड मेडल आहे. शूटींगमध्ये अवनी लेखराने गोल्ड मेडल पटकावलं आहे. 10 मीटर एयर राइफलमध्ये हे मेडल भारताला मिळालं आहे. 

पॅरालिम्पिकमध्ये गोल्ड मेडल पटकावणारी अवनी पहिली भारतीय महिला जिंकली आहे. अवनीच्या गोल्ड मेडलमुळे भारताच्या खात्यात आता 4 मेडल्स जमा झाली आहेत. 

19 वर्षांची शूटर अवनीने 10 मीटर एअर रायफल क्लास एसएच1 मध्ये पहिला नंबर पटकावला आहे. तिने 249.6 स्कोर करत पहिल स्थान पक्क केलं. पॅरालिम्पिकच्या इतिहासात शूटींगमधील हे पहिलंचं गोल्ड मेडल आहे. 

तर दुसरीकडे भारताच्या योगेश कथुनियाला डिस्कस थ्रोमध्ये F56म मध्ये सिल्वर मेडल मिळालं आहे. रविवारी, भाविनाबेन पटेलने महिला एकेरी टेबल टेनिस स्पर्धेत वर्ग 4 आणि निषाद कुमारने पुरुषांच्या T47 उंच उडी स्पर्धेत रौप्य पदकं जिंकली.

याशिवाय डिस्कस थ्रोअर विनोद कुमारने रविवारी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या F52 स्पर्धेत आशियाई विक्रमासह कांस्यपदक जिंकलं. पण त्याच्या विकाराच्या वर्गीकरणाच्या निषेधामुळे विजयाचा आनंद साजरा करू शकला नाही. हा पदक समारंभ 30 ऑगस्टच्या संध्याकाळच्या सत्रापर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे