Nabha Gaddamwar : तुषार देशपांडेने गुपचूप उरकला साखरपुडा; पाहा काय करते होणारी बायको नभा?

Nabha Gaddamwar : चेन्नईचा गोलंदाज तुषार देशपांडे ( Tushar Deshpande ) ने गुपचूप साखरपुडा उरकल्याचं समोर आलं. सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत त्याने चाहत्यांना ही बातमी दिलीये. 

Updated: Jun 13, 2023, 08:52 PM IST
Nabha Gaddamwar : तुषार देशपांडेने गुपचूप उरकला साखरपुडा; पाहा काय करते होणारी बायको नभा? title=

Nabha Gaddamwar : लवकरच चेन्नई सुपर किंग्जचा ( Chennai Super Kings ) खेळाडू ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) लग्नबंधनात अडकला. दरम्यान आता ऋतुराजनंतर आता चेन्नईचा गोलंदाज तुषार देशपांडे ( Tushar Deshpande ) देखील सात फेरे घेणार आहे. धोनीच्या या चेल्याने नुकतंच गुपचूप साखरपुडा उरकल्याचं समोर आलं. सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत त्याने चाहत्यांना ही बातमी दिलीये. 

तुषारने त्याची बालपणीची क्रश नभा गद्दमवार ( Nabha Gaddamwar ) हिच्यासोबत साखरपुडा केला आहे. आयपीएल 2023 मध्ये चमकदार गोलंदाजी केल्यानंतर तुषारने ( Tushar Deshpande ) आता त्याच्या आयुष्याच्या नवी इनिंगची सुरूवात करतोय. तुषारच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायत. शिवम दुबे पत्नी अंजुम खानसोबत साखरपुड्याला उपस्थित असल्याचं दिसलं. दरम्यान कोण आहे तुषार देशपांडे ( Tushar Deshpande ) यांची पत्नी? नभा ( Nabha Gaddamwar ) नेमकं काय करते हे जाणून घेऊया.

तुषार देशपांडे ( Tushar Deshpande ) याची होणारी बायको नभा गड्डमवार ( Nabha Gaddamwar ) ही चित्रकार आहे आहे. नभाही उत्तम गिफ्ट्स डिझाइन करते. नभाचं ( Nabha Gaddamwar ) इंस्टाग्रामवर पेंटींगचं पेज देखील आहे. ज्यामध्ये तिने स्वतः केलेल पेंटिंग्ज आणि तिच्या डिझाइनचे फोटो शेअर केले आहेत. 

सीएसकेच्या सामन्याला लावली होती उपस्थिती

तुषार देशपांडे( Tushar Deshpande ) हा आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता. त्याने 16 सामन्यात 26.86 च्या सरासरीने 21 विकेट घेतल्या आहे. चेन्नईने तुषारला ( Tushar Deshpande ) अवघ्या 20 लाखांमध्ये विकत घेतलं होतं. 2020 मध्ये तुषारने आयपीएलमध्ये डेब्यू केला होता. दरम्यान यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईच्या सामन्यांना नाभाची उपस्थिती दिसून आली होती.

नभा ( Nabha Gaddamwar ) ही तुषारची ( Tushar Deshpande ) शाळेपासूनची क्रश असल्याची माहिती आहे. तुषारला शाळेच्या दिवसांपासूनच नभा ( Nabha Gaddamwar ) आवडायची. साखरपुड्यानंतर त्याने स्वतः फोटो शेअर करून याबाबत माहिती दिलीये. टेस्ट क्रिकेटमध्ये वापरण्यात येणारा लाल बॉलवर तुषारच्या एंगेजमेंटची रिंग ठेवण्यात आली होती.