Urvashi Rautela On Rishabh Pant: ऋषभचं नाव घेताच उर्वशीने असं काही केलं की...; पाहा VIDEO

Rishabh Pant Urvashi Rautela: सध्या व्हायरल (Viral Video) झालेल्या या व्हिडिओमध्ये पत्रकाराने उर्वशीला विविध प्रश्न विचारत होता. अखेरच्या क्षणी उर्वशीला पत्रकाराने ऋषभ पंतबद्दल प्रश्न विचारला अन्...

Updated: Mar 25, 2023, 11:08 PM IST
Urvashi Rautela On Rishabh Pant: ऋषभचं नाव घेताच उर्वशीने असं काही केलं की...; पाहा VIDEO
Rishabh Pant Urvashi Rautela

Urvashi Rautela reaction on Rishabh Pant: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) यांच्या नावाची जोडी नेहमी जुळवली जाते. दोघांनीही काही नसल्याचं स्पष्ट केलं असलं तरी चाहत्यांनी नेहमी मुद्दा उचलून धरलेला दिसतो. ऋषभचा अपघात (Rishabh Pant Accident) झाला, त्यानंतर देखील उर्वशीला ट्रोल केलं जातं होतं. अशातच आता एका कार्यक्रमात ऋषभचं नाव घेताच उर्वशीने अशी काही रिअॅक्शन दिलीये की, सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.

नेमकं काय घडलं?

सध्या व्हायरल (Viral Video) झालेल्या या व्हिडिओमध्ये पत्रकाराने उर्वशीला विविध प्रश्न विचारत होता. उर्वशी प्रत्येक प्रश्नाला अतिशय शांतपणे उत्तर देत होती. अखेरच्या क्षणी उर्वशीला पत्रकाराने ऋषभ पंतबद्दल प्रश्न विचारला. ऋषभ पंत जखमी असताना तुम्ही त्याला शुभेच्छा पाठवल्या होत्या, त्यानंतरही तुम्ही त्याच्याशी बोललात का? असा सवाल पत्रकाराने केला होता. त्यावर उर्वशी (Urvashi Rautela reaction on Rishabh Pant) चांगलीच भडकल्याचं दिसून आली.

काय म्हणाली Urvashi Rautela?

उर्वशी प्रत्येक प्रश्नाला अतिशय शांतपणे उत्तर देत असताना ऋषभचं नाव ऐकताच ती चांगलीच भडकली. पहिल्यांदा स्वत:ला शांत करत तिने, तुला काय हवे आहे? असा प्रश्न विचारला. त्यावेळी पत्रकाराने प्रश्नाला बगल देत राग शांत करण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा आपला प्रश्न मांडला. त्यावेळी उर्वशीने तुम्हाला फक्त काय पाहिजे, टीआरपी, टीआरपी आणि टीआरपी, असं उर्वशी म्हणाली. त्याचवेळी उर्वशीने ऋषभ पंतचा प्रश्न पटकन रिपोर्टरकडे वळवला आणि प्रश्न टाळल्याचं दिसून आलं.

पाहा VIDEO -

दरम्यान, उर्वशीनं एका मुलाखतीत 'RP' नं एकदा तिला भेटण्यासाठी हताश होऊन 16 वेळा मिस कॉल केले होते, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर उर्वशी आणि ऋषभ पंत यांचा संबंध जोडला जाऊ लागला. 2018 मध्ये उर्वशी आणि ऋषभ हे रिलेशनशिपमध्ये आले होते, पण त्याच वर्षी त्यांचा ब्रेकअप झाला, असं म्हटलं जातं.