रोहित शर्माला संघातून बाहेर काढायचं होतं; आता बनवला लज्जास्पद व्हिडीओ! दिग्गज क्रिकेटपटूचा गंभीर आरोप

kl rahul bad form in india vs australia series: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेमध्ये भारतीय सलामीवीर के. एल. राहुलच्या वाईट फॉर्मवरुन दोन माजी क्रिकेटपटू एकमेकांवर तुटून पडल्याचं चित्र आज ट्विटरवर पहायला मिळालं.

Updated: Feb 21, 2023, 09:16 PM IST
रोहित शर्माला संघातून बाहेर काढायचं होतं; आता बनवला लज्जास्पद व्हिडीओ! दिग्गज क्रिकेटपटूचा गंभीर आरोप title=

Venkatesh Prasad Vs Aakash Chopra: भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर के. एल. राहुलचा (kl rahul) खराब फॉर्म सध्या भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये के. एल. राहुलच्या बॅटला जो लगाम लागलाय तो बांगलादेशनंतर आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही दिसून येत आहे. बॉर्डर-गावस्कर चषकाच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये राहुलला विशेष चमक दाखवता आलेली नाही. के. एल. राहुलच्या या अपयशावरुन भारतीय संघांमधील दोन माजी क्रिकेटपटू सोशल मीडियावर एकमेकांवर तुटून पडले. माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) आणि सलामीवीर आकाश चौप्रामध्ये (Aakash Chopra)  ट्विटरवर शाब्दिक चकमक झाल्याचं पहायला मिळालं. 

नेमका काय वाद झाला?

भारतीय संघाचा सलामीवीर के. एल. राहुल बांगलादेश विरुद्धच्या मालिकेत अपयशी ठरल्यानंतर आता ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेतही त्याला लय गवसलेली नाही. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याला चांगली कामगिरी करता आलेली नाही. याचसंदर्भा व्यंकटेश प्रसादने के. एल. राहुलवर केलेल्या टीकेच्या ट्वीटवर आकाश चोप्राने प्रतिक्रिया नोंदवली. प्रसादचं ट्वीट हे अजेंडा असल्याचा आरोप चोप्राने केला. थेट प्रसादचं नाव घेऊन टीका करतानाचा व्हिडीओ आकाश चोप्राने पोस्ट केला. प्रसादने केलेलं प्रत्येक विधान कसं चुकीचं आहे हे आकडेवारीच्या आधारे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. 

प्रसादने पोस्ट केलं ते ट्वीट

आकाश चोप्राने केलेल्या या टीकेनंतर प्रसादही शांत राहिला नाही. माजी वेगवान गोलंदाजाने आधी आकाश चोप्रावर अनेक आरोप केले. त्यानंतर प्रसादने चोप्रावर टीका करताना एक लज्जास्पद व्हिडीओ तयार करुन मला कमी लेखण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हटलं. माझ्याबद्दलचे दावे पूर्णपणे चुकीचे असल्याचंही प्रसाद म्हणाला. प्रसादने रोहित शर्मासंदर्भात आकाश चोप्राने केलेल्या एका जुन्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर केला. या ट्विटमध्ये चोप्राने रोहित शर्माचा प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर करण्यासंदर्भात विधान केलं होतं. "वाह काय विशेष गोष्ट आहे. अजिंक्य रहाणे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाही. मात्र टॅलेंटेड रोहित शर्माला स्थान मिळालं आहे," असं चोप्राने ट्वीट केलं होतं.

यातून काय सूचित करायचं होतं प्रसादला?

या ट्वीटवरुन प्रसादला हेच दाखवून द्यायचं होतं की तो जी गोष्ट आज के. एल. राहुलबद्दल बोलत आहे तसेच विधान चोप्राने काही काळापूर्वी आऊट ऑफ फॉर्म राहिलेल्या रोहित शर्माबद्दल केलं होतं. या ट्वीटच्या माध्यमातून प्रसादने सध्या माझ्यावर प्रपोगांडा पसरवत असल्याचा आरोप करणाऱ्या आकाश चोप्राला त्याच्याच जुन्या ट्वीटच्या आधारे आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, के. एल. राहुलच्या मुद्द्यावरुन या दोघांमध्ये झालेल्या शाब्दिक बाचाबाचीची आज दिवसभर सोशल मीडियावर चर्चा असल्याचं पहायला मिळालं.