नवी दिल्ली : टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात जेव्हा टी-२० सीरिज सुरू झाली तेव्हापासून या सामन्यांकडे सर्वांचे लक्ष होते. असे वाटत होते ही सामने अधिक रोमांचक होती. पण ज्याप्रकारे टीम इंडियाने न्यूझीलंडला मात दिली त्याने अनेकांची निराशा झाली. पण टीम इंडियासाठी ही टी-२० सीरिज ऎतिहासिक ठरली कारण टीम इंडियाने प्रथमच न्यूझीलंडला टी-२० मध्ये मात दिली.
टीम इंडियाने न्यूझीलंडसारख्या टीमला कशी मात दिली असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. आता याचा खुलासा टीम इंडियाचा स्पिनर अक्षर पटेल याने केला आहे. त्याने सांगितले की, न्यूझीलंडच्या बॅट्समन्सना चकमा देण्यासाठी आम्ही एक खास रणनिती आखली होती.
अक्षर पटेल म्हणाला की, तो कधीही याचा विचार करून खेळत नाही की, टीममधील जागा पक्की आहे. अक्षर म्हणाला की, मी केवळ मॅच लक्षात ठेवून खेळतो. मला यावर विश्वास आहे की, या सामन्यात मी चांगला खेळलो की, पुढील सामन्यात नक्की जागा आपोआप मिळेल.
अक्षयने दिल्लीच्या सामन्याबद्दल सांगितले की, हे आमचं होमग्राऊंड आहे. मला या ग्राऊंडबद्दल माहिती आहे. इथे टर्न कमी मिळातो. क्रिझ माहीती असल्याने त्यानुसार मी बॉल टाकतो.