VIDEO : ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने भर मैदानावर केला अजब प्रकार

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बीच केपटाऊनमध्ये तिसरी टेस्ट मॅच खेळली गेली. 

Dakshata Thasale Updated: Mar 25, 2018, 08:50 AM IST
VIDEO : ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने भर मैदानावर केला अजब प्रकार title=

मुंबई : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बीच केपटाऊनमध्ये तिसरी टेस्ट मॅच खेळली गेली. 

दोन्ही संघ आतापर्यंत एक एक मॅच खेळले आहेत. आणि तिसरा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकण्यासाठी खेळाडू जोर लावत आहेत. मॅचमध्ये आतापर्यंत फक्त आफ्रिकेचा पगडा भारी असल्याचं समोर येत असून आता ऑस्ट्रेलिया संघावरच जास्त दबाव आहे. आणि याच प्रेशर खाली खेळाडू कोणत्याही स्थराला जाण्यासाठी तयार आहेत. 

नेमका काय घडला हा प्रकार? 

सुरूवातीपासूनच अनेक वाद आणि भांडणामुळे चर्चेत असलेली ही सिरीज शनिवार आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आली. शनिवारी ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडू बेनक्रॉफ्टने चेंडूसोबत छेडछाड केली आहे. 

ऑस्ट्रेलियाच्या बॉलरवर का आली अशी वेळ?

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी जेव्हा ऑफ्रिका 43 व्या ओव्हरमध्ये खेळत होती. तेव्हा मार्करम व एबी डिविलियर्स हे दोन खेळाडू मैदानावर होते. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज बेनक्रॉफ्ट एका चीप सारख्या गोष्टीसोबत कॅमेऱ्यात कैद झाला. असं सांगण्यात येत आहे की, बॉलची चमक उडवणारी ही चीप आहे. या चीपला त्याने त्या बॉलवर घासलं. त्याचक्षणी उपस्थित असलेल्या अंपायरने त्याला याबाबत विचारणा केली. मात्र अद्याप त्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 

या प्रकाराचा व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियासमोर आली तेव्हा साऱ्यांनाच धक्का बसला. सगळ्यांनी खूप खेद व्यक्त केला कारण ऑस्ट्रेलियासारखी जगतजेती टीमने असा प्रकार करणं कुणालाही रुचलेलं नाही. मात्र अद्याप त्याने हा कोणता प्रकार कशासाठी केला याचं उत्तर मिळेल. मात्र आताच काही लोकांनी बेनक्राफ्टला चीटर घोषित केलं आहे.