मुंबई: दोन वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर परतलेला चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने जोरदार कामगिरी करत एक उत्तुंग षटकार ठोकला. हा षट्कार इतका उत्तुंग होता की, त्या षटकाराची विक्रमी नोंद झाली. सोमवारी (३० एप्रिल, २०१८) झालेल्या सामन्यात दिल्लीला पराभूत करून चेन्नईने थेट १२ गुणांची आघाडी घेतली आहे. पुण्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात शेन वॉटसन (७०) आणि धोनीच्या (५१) नाबाद अर्धशतकी खेळीने संघाने २११ धावा केल्या. दरम्यान, या लक्ष्याचा पाटलाग करण्यसाठी मैदानात उतरलेल्या दिल्लीला केवळ १९८ धावाच करता आल्या. त्यामुळे गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरलेल्या या संघाला १३ धावांनी पराभव पत्करावा लागला. दोन्ही संघाला अद्याप ६ सामने खेळायचे आहेत.
दरम्यान, दिल्लीचा युवा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा पुरेपूर फायदा घेत सामन्याची धमाकेदार सुरूवात केली. १०० धावा झाल्या तरी दिल्लीला चेन्नईचा एकही गडी बाद करता आला नाही. पण, चार षटकं झाल्यावर चेन्नईचे ४ गडी टीपण्यास दिल्लीला यश आले. पण, त्यानंतर धोनीने जी खेळी केली ती, जबरदस्त होती. धोनीने या सामन्यात अवघ्या २२ धावांमध्ये अर्धशतक ठोकले. ज्यात ५ षटकारांचा समावेश आहे. धोनीने एक षटकार तर असा ठोकला की, त्याचा विक्रम झाला. धोनीने ठोकलेला हा षटकार १०८ मीटर उंचीचा होता.
MSD Six from Video Babu on Vimeo.
धोनीनेच्या खेळीमुळे चेन्नईने शेवटच्या पाच षटकांमध्ये ७४ धावा केल्या. धोनीने १५१ सामन्यांची कर्णधारी करत आतापर्य़ंत ३५५६ धावा केल्या आहेत.