VIDEO: धोनी इतका CUTE असेल, याचा विचारही तुम्ही केला नसेल!

महेंद्र सिंह धोनी हा नेहमीच सर्वांना सिरीअस खूप विचारी असल्याचं बघायला मिळतं. पण त्याच्यातही एक गंमतीखोर लहान मुल दडलंय हे नुकतंच बघायला मिळालं.

Updated: Dec 26, 2017, 06:09 PM IST
VIDEO: धोनी इतका CUTE असेल, याचा विचारही तुम्ही केला नसेल! title=

मुंबई : महेंद्र सिंह धोनी हा नेहमीच सर्वांना सिरीअस खूप विचारी असल्याचं बघायला मिळतं. पण त्याच्यातही एक गंमतीखोर लहान मुल दडलंय हे नुकतंच बघायला मिळालं.

सहकारी खेळाडू धोनीच्या गंमतीदार स्वभावाबद्दल सांगत असतात. पण तसा तो कधी कॅमेरावर बघायला मिळाला नाही. मुंबईत खेळल्या गेलेल्या शेवट्च्या टी-२० सामन्यानंतर टीम इंडियाने ख्रिसमस साजरा केला. यावेळी धोनीलाही गंमत करताना बघायला मिळाले. यावेळी त्याने इतरांसारखी लाल टोपी घालून मस्ती केली. 

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या शेवटच्या टी-२० सामन्यात टीम इंडियाने दमदार विजय मिळवत सीरिज खिशात घातली. त्यामुळे यावर्षाचा शेवट टीम इंडियाने विजयी सलामी देऊन केला असे म्हणावे लागेल. त्याचाच आनंद सर्व खेळाडूंनी वेगळ्या पद्धतीने केला.