बंगळुरू : महेंद्रसिंग धोनीची जेव्हा आलोचना होते तेव्हा तो शानदार कमबॅक करतो. धोनीच्या या कमबॅकमुळे त्याच्या टीकाकारांची बोलतीही बंद होते. धोनी तीन महिन्यांनी ३७ वर्षांचा होईल. धोनीचं वय झाल्यामुळे आता त्याच्याऐवजी दुसऱ्या खेळाडूचा शोध घेतला पाहिजे असंही बोललं जातं. पण प्रत्येकवेळी धोनी अशा चर्चा करणाऱ्यांना खोटं ठरवतो. आयपीएलमध्ये बुधवारी चेन्नई आणि बंगळुरूमध्ये मॅच झाली. या मॅचमध्ये धोनीनं बॅटिंग, विकेट कीपिंग आणि फिल्डिंगमध्ये जबरदस्त कामगिरी केली. या मॅचमध्ये धोनीनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. चेन्नईच्या बॉलरनी धोनीचा हा निर्णय योग्य ठरवला. बंगळुरूचा कॅप्टन विराट कोहली या मॅचमध्ये लवकर आऊट झाला.
विराटच्या विकेटनंतर एबी डिव्हिलियर्स आणि क्विंटन डिकॉकनं शतकी पार्टनरशीप करून बंगळुरूची इनिंग सावरली. क्विंटन डिकॉक बॅटिंग करत असताना धोनीनं त्याच्या चित्त्यासारख्या चपळाईचा नजारा दाखवला. क्विंटन डिकॉकनं मारलेला शॉट धोनीच्या डोक्यावरून गेला. हा बॉल सीमा रेषेच्या बाहेर जाईल, असं वाटत होतं. पण धोनी वेगानं पळाला आणि फोर वाचवली.
हा बॉल अडवण्यासाठी धोनीनं ६ सेकंदात २२ मीटर पळाला. यादरम्यान धोनी २२ किलोमिटर प्रतितासाच्या वेगानं धावला. ही फोर अडवताना धोनीनं टीमच्या रन तर वाचवल्याच पण आपण किती तंदुरुस्त आहोत हे पुन्हा एकदा सिद्ध केलं.
बॅटिंग करताना धोनीनं ३४ बॉलमध्ये ७० रन करून चेन्नईच्या टीमला विजय मिळवून दिला. या खेळीमुळे धोनीला मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन गौरवण्यात आलं.
.@ChennaiIPL This is why Dhoni is extraordinary. Running with pads and gear @ 22 KMPH and he is 36 years old. Insane ! #CSK #CSKvsRCB #ThalaDhoni pic.twitter.com/0PU7e4nPGo
— Sudharsan Raman (@tsu_darshan) April 26, 2018