TamilNadu Scores 506 Runs : भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असून भारतामध्ये सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) युवा खेळाडूंनी वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये तामिळनाडूच्या संघाने अरूणाचल प्रदेशविरोधात 506 धावांचा डोंगर उभा केला आहे. प्रथम फलंदाजी करताना तामिळनाडूने 50 ओव्हरमध्ये विकेट्स गमावत 506 धावा केल्या आहेत. तामिळनाडू संघाने विश्वविजेत्या इंग्लंड संघाचा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडित काढला आहे. (vijay hazare trophy records tamil nadu becomes 1st team to score 500 runs in list a cricket world record)
तामिळनाडूचा सलामीवीर (Sai Sudarshan) साई सुदर्शनने 102 चेंडूत 154 धावा केल्या. त्याचवेळी नारायण जगदीशनने (Narayan Jagadeesan) 141 चेंडूत 277 धावांची खेळी केली. तामिळनाडूचे सलामीवीर साई किशोर आणि नारायण जगदीशन यांनी पहिल्या विकेटसाठी 416 धावांची भागीदारी केली. तामिळनाडूचा सलामीचा फलंदाज नारायण जगदीशन याने अरुणाचल प्रदेशच्या गोलंदाजांना धु धु धुतलं आहे. या भागीदारीमध्ये दोघांनी 25 चौकार आणि 15 षटकार ठोकले.
50 षटकांमध्ये संघाची सर्वोच्च धावसंख्या इंग्लंड संघाने केली होती. याआधी इंग्लंड संघाने नेदरलँडविरूद्ध 498 (ENGvsNED) धावा केल्या होत्या. या सामन्यात अनेक विश्वविक्रम मोडले गेले. तामिळनाडूचा सलामीवीर एन जगदीसनने 277 धावांची खेळी खेळली जी लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वात मोठी खेळी आहे. एवढंच नाही तर त्याने सलग पाच शतके ठोकण्याचा विश्वविक्रमही (world record) केला.
या सामन्यामधील एक खास गोष्ट म्हणजे दोन्ही सलमीवीर साई सुदर्शन आणि नारायण जगदीशन हे दोघे बाद झाल्यावर तामिळनाडूच्या इतर फलंदाजांनी फक्त एक चौकार मारला आहे.