मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज सामना रंगणार आहे. दोन्ही टीमसाठी ही मॅच महत्त्वाची आहे. जो आज जिंकेल तो सेमीफायनलला जाईल आणि जो हारेल त्याला घरी परताव लागेल. द ओवल मैदानावर सेमीफायनल होणार आहे आणि यासाठी भारत आणि आफ्रिका दोन्ही टीम सज्ज झाल्या आहेत.
२०१३ ची चॅम्पियन्स ट्रॉफी भारताने जिंकली होती. पण २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताकडून आर. अश्विनने महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. भारताचा श्रीलंकेविरोधात पराभव झाल्याने भारतीय संघ पुन्हा एकदा विचार करायला लागला. चूक कुठे झाली हे पाहण्याची संधी भारताला त्या सामन्यातून मिळाली. पण अश्विनला अजून या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये संधी मिळालेली नाही. पण आजच्या सामन्यात केदार जाधव ऐवजी ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनला संधी मिळू शकते.
भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, युवराज सिंह, महेंद्र सिंह धोनी (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, केदार जाधव, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, दिनेश कार्तिक, अजिंक्य रहाणे.
दक्षिण आफ्रिका संघ
अब्राहम डिविलियर्स (कप्तान), हाशिम अमला, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), डेविड मिलर, ज्यां पॉल ड्यूमिनी, फाफ डु प्लेसिस, इमरान ताहिर, केशव महाराज, फरहान बेहरदीन, क्रिस मौरिस, वेन पार्नेल, अंदिले फेहुवलक्वायो, डवायन फ्रीटोरियस, कागिसो रबाडा.