आफ्रिकेविरोधातील मॅच आधी युवराज बद्दल बोलला विराट

विराटने केलं युवराज सिंगबाबत एक मोठं वक्तव्य

Updated: Jun 11, 2017, 11:17 AM IST
आफ्रिकेविरोधातील मॅच आधी युवराज बद्दल बोलला विराट title=

मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सामना होणार आहे. दोन्ही संघासाठी ही मॅच महत्त्वाची आहे. सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी ही मॅच जिंकणं महत्त्वाचं आहे. पण त्याआधी विराटने युवराज सिंगबाबत एक वक्तव्य केलं आहे. विराटने म्हटलं आहे की, भारतीय टीमसाठी युवराजने महत्त्वपूर्ण यश मिळवलं आहे. वैयक्तिक जीवनातही युवराजने संघर्ष केला आहे आणि विजय मिळवला आहे.

कोहलीने म्हटलं की, युवी मोठा फायटर आहे आणि तो मोठ्या मॅचमध्ये परफॉर्म करण्यासाठी जाणला जातो. त्याने टीमला दोन विश्व कप मिळवून देण्यामागे महत्त्वाची भूमिका निभावली आहे. टीम आज चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दक्षिण आफ्रिके विरोधात मोठा सामना खेळणार आहे. या सामन्यात युवी शानदार आणि प्रेरणादायी प्रदर्शन करेल. त्याने भारतीय क्रिकेटला खूप काही दिलं आहे. पुढे पण तो लक्षात राहतील अशी कामगिरी करेल. युवीने त्याच्या वैयक्तीक जीवनात क्रिकेटपेक्षा मोठ्या गोष्टीशी संघर्ष केला आहे. त्याचं जीवन युवकांसाठी प्रेरणादायी आहे.