विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेत मोडला ब्रॅडमॅनचा 'हा' रेकॉर्ड

क्रिकेटर विराट कोहली लग्नानंतर पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरला आहे.

Updated: Jan 16, 2018, 01:56 PM IST
विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेत मोडला ब्रॅडमॅनचा 'हा' रेकॉर्ड   title=

दक्षिण आफ्रिका : क्रिकेटर विराट कोहली लग्नानंतर पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरला आहे.

विराटचा क्रिकेटच्या मैदानावरील जलवा पुन्हा दिसायला सुरूवात झाली आहे. भारतीय क्रिकेट संघ सध्या सेंच्युरियनमध्ये कसोटी सामना खेळत आहे.विराट कोहलीच्या दमदार शतकासह भारताचा पहिला डाव 307 धावांवर आटपला आहे.  

विराटचं 21 वं शतक  

दक्षिण आफ्रिकेमध्ये विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेत त्याच्या करियरमधील 21 वे शतक ठोकले आहे.  153 धावांवर विराट कोहलीला मोर्ने मोर्कलने आउट केले आहे.  

विराट कोहलीची सर ब्रॅडमॅनच्या रेकॉर्डसोबत बरोबरी  

डॉन ब्रॅडमॅन  यांनी कर्णधारपदाच्या रूपात आठ वेळेस 150+ धावा केल्या होत्या. विराट कोहलीने त्याच्या करियरमधील 65 व्या कसोटी सामन्यात 9 वेळेस 150+ धावा केल्या आहेत. यापूर्वी मायकल क्लार्कने सात वेळेस  150+ धावा केल्या आहेत. 

यापाठोपाठ महेला जयवर्धने, ब्रायन लारा,ग्रीम स्मिथने करियरमध्ये सात वेळेस कर्णधार असताना 150+ धावा केल्या आहेत. 

आशियातील दुसरा कर्णधार 

 25 वर्षांमध्ये आफ्रिकेच्या भूमीत अशाप्रकारे शतक ठोकणारा विराट हा दुसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावावर होता.