149 KM/h वेगापेक्षा जलद गोलंदाजी केली आहे ६ भारतीय गोलंदाजांनी

  न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या अंडर १९ वर्ल्डकपमध्ये भारताचा जलदगती गोलंदाज कमलेश नागरकोटी याने आपल्या वेगाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.   त्याने सामन्यात ताशी १४९ किमीच्या वेगाने चेंडू टाकला. या नंतर आतापर्यंत कोणत्या भारतीयाने १४९ पेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी केली आहे. यावर चर्चा सुरू झाल्या. 

Updated: Jan 16, 2018, 12:40 PM IST
 149 KM/h वेगापेक्षा जलद गोलंदाजी केली आहे ६ भारतीय गोलंदाजांनी

ऑकलंड :  न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या अंडर १९ वर्ल्डकपमध्ये भारताचा जलदगती गोलंदाज कमलेश नागरकोटी याने आपल्या वेगाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.   त्याने सामन्यात ताशी १४९ किमीच्या वेगाने चेंडू टाकला. या नंतर आतापर्यंत कोणत्या भारतीयाने १४९ पेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी केली आहे. यावर चर्चा सुरू झाल्या. 

नागरकोटीसोबत आणखी पाच गोलंदाज आहेत त्यांनी ताशी १४९ पेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी केली आहे. 

पाहू या कोण आहेत ते... 

आर पी सिंग याने ताशी १४७ किलोमीटर वेगाने चेंडू टाकला होता.   हा चेंडू त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सिरीजमध्ये टाकला होता. 

एस श्रीसंत याने एकदा १४९ च्या वेगाने चेंडू टाकला होता.   २७ टेस्टमध्ये त्याने ८७ विकेट पटकावल्या होत्या. 

आशीष नेहराने डर्बनमध्ये झिम्बाव्बे विरोधात १४९.७ च्या वेगाने वनडेमध्ये चेंडू टाकला होता. 

उमेश यादव याने २०१२ मध्ये श्रीलंका विरोधात १५२.५ किमी वेगाने चेंडू टाकला होता. 

वरूण एरॉन २०१४ मध्ये श्रीलंका विरूद्ध १५२.५ किमी वेगाने जलद चेंडू फेकला होता. 

इशांत शर्मा याने २००८मध्ये पहिल्या सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात १५२.६ किमी वेगाने चेंडू फेकला होता. 

जवागल श्रीनाथ याने पाकिस्तान विरूद्ध सामन्यात ताशी १५४.५ किमी वेगाने चेंडू टाकला होता. 

पाहा व्हिडिओ