ब्रायंटच्या मृत्यूमुळे विराट कोहलीला धक्का, ट्विटवरुन माहिती

अनेक भारतीय खेळाडूंनी व्यक्त केलं दु:ख

Updated: Jan 27, 2020, 12:35 PM IST
ब्रायंटच्या मृत्यूमुळे विराट कोहलीला धक्का, ट्विटवरुन माहिती

मुंबई : दिग्गज बास्केटबॉल खेळाडू कोबी ब्रायंट (Kobe Bryant) आणि त्याची मुलगी गियाना यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनेत मुत्यू झाला आहे. ज्यामुळे अनेक खेळाडूंना धक्का बसला आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांना देखील या बातमीने धक्का बसला आहे. टीम इंडियाचा (Team India) कर्णधार विराट कोहली याने यावर ट्विट करत भावना व्यक्त केली आहे.

त्यांने म्हटलं की, ही बातमी ऐकून झटका लागला आहे. ब्रायंटसोबत लहानपणीच्या काही आठवणी आहेत. ब्रायंटचा खेळ पाहण्यासाठी सकाळी लवकर उठत असे. त्याचे मैदानावरील कारनामे पाहून नाचत होतो. या दुर्घटनेत त्याच्या मुलीचा ही दुर्दैवी मृत्यू झाला. हे हृदय पिळवून टाकणारं होतं.

भारताचा बॅट्समन रोहित शर्माने म्हटलं की, जगासाठी आजचा दिवस दुखद आहे. खेळातील दिग्गजांमधल्या एकाने आज जगाला अलविदा केलं आहे. ब्रायंट आणि त्याची मुलगी गियानासह दुर्घटनेत मृत्यू झालेल्या प्रत्येकाला श्रद्धांजली.

भारताचा खेळाडू शिखर धवन (Shikhar Dhawan) याने देखील यावर दु:ख व्यक्त केलं आहे. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने देखील ट्विट करत ब्रायंट आणि त्याच्या परिवारासाठी शोक व्यक्त केला.

ब्रायंट (Kobe Bryant)हा खासगी हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असताना त्याच्या सोबत असलेल्या ९ जणांचं य़ा दुर्घटनेत मृत्यू झाला. हेलिकॉप्टरला आग लागल्यामुळे ही दुर्घटना घडली. आपल्या २० वर्षाच्या करिअरमध्ये त्याने अनेक सन्मान मिळवले.