'विराट' विक्रम! हे रेकॉर्ड करणारा एकमेव खेळाडू

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० मध्ये भारताचा ७ विकेटने विजय झाला.

Updated: Sep 19, 2019, 11:56 AM IST
'विराट' विक्रम! हे रेकॉर्ड करणारा एकमेव खेळाडू title=

मोहाली : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० मध्ये भारताचा ७ विकेटने विजय झाला. या विजयासोबतच भारताने ३ टी-२० मॅचच्या सीरिजमध्ये १-०ने आघाडी घेतली आहे. कर्णधार विराट कोहली भारताच्या या विजयाचा शिल्पकार ठरला. या मॅचमध्ये विराट कोहलीने ५२ बॉलमध्ये नाबाद ७२ रनची खेळी केली. विराटच्या या खेळीमध्ये ४ फोर आणि ३ सिक्सचा समावेश होता.

अर्धशतकी खेळी केल्यामुळे विराट कोहलीची टी-२० क्रिकेटमधली सरासरीही ५०च्यावर गेली आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ५० पेक्षा जास्त सरासरी असणारा विराट हा जगातला एकमेव खेळाडू आहे. विराटची टी-२०मध्ये ५३.१४, वनडेमध्ये ६०.३१ आणि टेस्टमध्ये ५३.१४ एवढी सरासरी आहे. आयसीसीनेही विराटच्या या कामगिरीचं कौतुक केलं आहे.

विराटने ७९ टेस्टमध्ये ६,७४९ रन, २३९ वनडेमध्ये ११,५२० रन आणि ७१ टी-२०मध्ये २४४१ रन केले आहेत. टी-२०मध्ये विराट हा सर्वाधिक रन करणारा खेळाडू आहे. तसंच टी-२०मध्ये सर्वाधिक अर्धशतकं करण्याचा विक्रमही विराटच्या नावावर आहे. टी-२०मध्ये विराटने आतापर्यंत २२ अर्धशतकं केली आहेत.