IPL 2024 : संजू सॅमसन होणार होता CSK चा कॅप्टन? आर आश्विनने स्पष्टच सांगितलं, म्हणतो...

IPL 2024 Auction : सोशल मीडियावर एका व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये दावा करण्यात आला होता की, संजू सॅमसन (Sanju Samson) चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कॅप्टन होणार होता. या वृत्तावर आश्विनने (R Ashwin) साफ नकार दिला आहे. 

सौरभ तळेकर | Updated: Nov 29, 2023, 11:46 PM IST
IPL 2024 : संजू सॅमसन होणार होता CSK चा कॅप्टन? आर आश्विनने स्पष्टच सांगितलं, म्हणतो... title=
Chennai Super Kings, sanju viswanath samson

Sanju Samson On CSK Captain : आयपीएल 2024 चा लिलाव (IPL 2024 Auction) 19 डिसेंबर रोजी दुबईतील कोका-कोला एरिना येथे होणार आहे. भारताबाहेर लिलाव होण्याची ही पहिलीच वेळ असेल. ऑक्शनआधी सीएसकेने चाहत्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला. महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) पुन्हा 2024 च्या हंगामात पिवळ्या जर्सीत दिसणार आहे. त्यामुळे आता चेन्नईच्या (Chennai Super Kings) चाहत्यांचा आनंद गगनात मावेना झालाय. अशातच आता आर आश्विनने (R Ashwin) एक पोस्ट करत एका वृत्तावर मोठा खुलासा केला आहे. 

सोशल मीडियावर एका व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये दावा करण्यात आला होता की, संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्जचा कॅप्टन होणार होता. या वृत्तावर आश्विनने साफ नकार दिला आहे. 

काय होती ती पोस्ट?

रविचंद्रन अश्विनने एका युट्यूबवरील मुलाखतीत म्हटलं होतं की, संजू सॅमसनला चेन्नई सुपर किंग्जने कॅप्टन म्हणून संपर्क साधला होता, जो जवळपास फायनल झाला होता. पण संजूने त्यांची ऑफर नाकारली नाही. त्यात एक निश्चित शक्यता आहे, असं @CricketWithRosh नावाच्या एका युझरने लिहिलं होतं. त्यावर आश्विनने रिल्पाय करत उत्तर दिलं आहे. "फेक न्यूज! माझा उल्लेख करून करून खोटं पसरवू नका", असं आश्विनने म्हटलं आहे.

दरम्यान, इंग्लंडचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स वर्कलोड मॅनेजमेंटच्या कारणामुळे इंडियन प्रीमियर लीगचा 2024 हंगाम खेळणार नाही. अशातच आता चेन्नईच्या संघात 8 खेळाडू यंदा दिसणार नाही. सुपर किंग्जकडे आता 32.1 कोटी रुपयांचे बजेट शिल्लक आहे. 

चेन्नई सुपर किंग्ज

कायम ठेवलेले खेळाडू : अजय मंडल, अजिंक्य रहाणे, दीपक चहर, डेव्हॉन कॉनवे, महेश तिक्षाणा, मथीशा पथिराना, मिचेल सँटनर, मोईन अली, एमएस धोनी, मुकेश चौधरी, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शेख रशीद, शिवम दुबे , सिमरजीत सिंग, तुषार देशपांडे.

सोडलेले खेळाडू : आकाश सिंग, अंबाती रायुडू, बेन स्टोक्स, भगत वर्मा, ड्वेन प्रिटोरियस, काइल जेमिसन, सिसांडा मगला, सुभ्रांशु सेनापती.