Kieron Pollard | वेस्टइंडिजचा कॅप्टन कायरन पोलार्डची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

आयपीएलचा 15 वा मोसम (IPL 2022) सुरु असताना स्टार ऑलराऊंडर बॅट्समनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

Updated: Apr 20, 2022, 10:05 PM IST
Kieron Pollard | वेस्टइंडिजचा कॅप्टन कायरन पोलार्डची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती title=

मुंबई :  क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. आयपीएलचा 15 वा मोसम (IPL 2022) सुरु असताना स्टार ऑलराऊंडर बॅट्समनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. एनएआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. वेस्टइंडिजचा कॅप्टन आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या धिप्पाड कायरन पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. (west indies cricketer kieron pollard announces his retirement from international cricket during ipl 2022)