बाबा गेले कुठे? WTC Final सामन्यादरम्यान रविचंद्रन अश्विनच्या मुलीचा फोटो व्हायरल

Ravichandran Ashwin : अश्विनचा टीममध्ये समावेश नाही हे पाहताच चाहत्यांना मोठा धक्का बसला. दरम्यान यानंतर अश्विनच्या मुलीचा एक फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

Updated: Jun 7, 2023, 06:41 PM IST
बाबा गेले कुठे? WTC Final सामन्यादरम्यान रविचंद्रन अश्विनच्या मुलीचा फोटो व्हायरल title=

Ravichandran Ashwin : इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा ( ICC World Test Championship ) फायनल सामना खेळवण्यात येतोय. या सामन्यामध्ये टीम इंडियाचा ( Team India ) कर्णधार रोहित शर्माने (  Rohit Sharma ) टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान या सामन्यामध्ये उत्तम ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनला ( Ravichandran Ashwin ) मात्र बाहेर ठेवण्यात आलं आहे. अश्विनचा टीममध्ये समावेश नाही हे पाहताच चाहत्यांना मोठा धक्का बसला. दरम्यान यानंतर अश्विनच्या मुलीचा एक फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

रोहित शर्मा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल ( ICC World Test Championship ) सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये एकूण चार वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरलाय. या सामन्यात रोहितने (  Rohit Sharma ) गोलंदाज आर अश्विनला ( Ravichandran Ashwin ) प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली नाही. यावेळी चाहत्यांनीही रोहित शर्मावर (  Rohit Sharma ) ताशेरे ओढले आहेत.

अश्विनच्या मुलीचा फोटो होतोय व्हायरल

सामन्यादरम्यान अश्विनच्या मुलीचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. या फोटोमध्ये अश्विनची मुलगी दुर्बिणीच्या सहाय्याने मैदानावर पाहताना दिसतेय. हा फोटो ट्विट करत एका युझरने म्हटलंय की, दुर्बिणीच्या मदतीने अश्विनची गोंडस मुलगी आपल्या वडिलांना शोधतेय. सध्या सोशल मीडियावर हा फोटो प्रंचड व्हायरल होतोय. 

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यामध्ये रविचंद्रन अश्विन ( Ravichandran Ashwin ) ला रोहित शर्माने (  Rohit Sharma ) संधी दिली नाही. टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपर्यंत पोहोचवण्यासाठी रविचंद्रन अश्विनचा मोठा वाटा होता. असं असतानाही टीममध्ये त्याला संधी न मिळणं हे चाहत्यांना पटलं नाही. यावरून चाहत्यांनी सोशल मीडियावर रोहित शर्माला (  Rohit Sharma ) खडे बोल देखील सुनावले.

इंग्लंडच्या ओव्हल मैदानातील कंडीशन आणि पीचला अनुसरून कर्णधार रोहित शर्मा (  Rohit Sharma ) आणि कोच राहुल द्रविड यांनी प्लेईंग 11 निवडली आहे. कर्णधार रोहित शर्माने टॉसच्या वेळी सांगितलं की, रविचंद्रन अश्विनसारख्या खेळाडूला टीममधून बाहेर ठेवणं हा कठीण निर्णय आहे. तो अनेक वर्षांपासून सामना जिंकवून देणारा महत्त्वाचा खेळाडू आहे. परंतु आम्हाला हा कठीण निर्णय घ्यावा लागला.