IND vs SA : कॅप्टन कुल धोनीला टेन्शनमध्ये टाकणाऱ्या 'या' खेळाडूची टीम इंडियामध्ये एन्ट्री!

Who is Sai Sudharsan ? इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आयपीएलमध्ये नियम आला होता. त्यावेळी गुजरात टायटन्सने इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात साईला मैदानात आणलं अन् साईने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 96 धावांची धुंवाधार खेळी केली होती. त्यानंतर टीम इंडियाला (Team India Squad for South Africa tour) सुपरस्टार मिळाल्याची जोरदार चर्चा झाली.

सौरभ तळेकर | Updated: Dec 1, 2023, 05:08 PM IST
IND vs SA : कॅप्टन कुल धोनीला टेन्शनमध्ये टाकणाऱ्या 'या' खेळाडूची टीम इंडियामध्ये एन्ट्री! title=
Who is Sai Sudharsan Player selected in Team India Squad for South Africa tour

Team India Squad for South Africa tour : साऊथ अफ्रिकाच्या दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाची (Team India) घोषणा बीसीसीआयने (BCCI) केली आहे. कोणालाही नाराज करायचं नाही, या फॉर्म्युल्याचा अवलंब करत निवड समितीने चर्चेत असलेल्या जवळजवळ सर्व खेळाडूंना संधी दिली आहे. अशातच कोणालाही अपेक्षा नसताना एका खेळाडूच्या नावाची टीम इंडियामध्ये संधी दिली गेली ते नाव म्हणजे साई सुदर्शन... गुजरात टायटन्सकडून (Gujarat Titans) खेळणाऱ्या साई सुदर्शनने (Sai Sudharsan) आपल्या दमदार कामगिरीमुळे सर्वांना चकित केलं होतं. मात्र, कॅप्टन कुल धोनीला टेन्शन देणारा साई सुदर्शन आहे तरी कोण? पाहुया...

निवड समितीने घेतलेला सर्वात आश्चर्यकारक निर्णय वनडे संघाबाबत घेतलाय. शुभमन गिलचा वनडे संघात समावेश करण्यात आलेला नाही. तर साई सुदर्शन आणि रजत पाटीदार यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे यापैकी एक खेळाडू दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऋतुराज गायकवाड याच्यासोबत सलामीला उतरणार आहे. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आयपीएलमध्ये नियम आला होता. त्यावेळी गुजरात टायटन्सने इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात साईला मैदानात आणलं अन् साईने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 96 धावांची धुंवाधार खेळी केली होती. त्यानंतर टीम इंडियाला सुपरस्टार मिळाल्याची जोरदार चर्चा झाली.

साईची खास शैली म्हणजे त्याची लवचिक फलंदाजी... 2007 मध्ये युवराज सिंहची फलंदाजी ज्यांनी पाहिली असेल, त्यांना साईकडे पाहिल्यावर युवराजची शैलीची आठवण येईल. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटला साजेशी फलंदाजी करण्याची ताकद साई सुदर्शनमध्ये आहे. इमर्जिंग आशिया कपमध्ये सुदर्शनला टीम इंडियामध्ये संधी देण्यात आली होती. त्यावेळी देखील त्याने चमकदार कामगिरी करत 220 धावांची आक्रमक फलंदाजी केली होती. गुजरात टायटन्सने 20 लाखाच्या किमतीत त्याला संघात सामील करून घेतलं होतं. मात्र, आता तो येत्या काळात टीम इंडियाचा प्रमुख फलंदाज असेल, यात काही शंका नाही.

साई सुदर्शन आहे तरी कोण?

साई सुदर्शन (Sai Sudharsan) हा मुळचा तामिळनाडूचा. साई सुदर्शनचे वडील (Sai Sudharsan Father) आर भारद्वाज यांनी दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे आणि आई (Sai Sudharsan Mother) उषा भारद्वाज यांनी तामिळनाडूसाठी राष्ट्रीय स्तरावर व्हॉलीबॉल खेळली आहे. आयपीएलच्या अगदी आधी झालेल्या तामिळनाडू प्रीमियर लीग लिलावात, लायका कोवई किंग्जने त्याला तब्बल 21.60 लाख रुपयांना विकत घेतल्यानंतर सुदर्शन हा स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता.

ज्यावेळी साई पहिल्यांदा आयपीएल खेळणार होता, त्यावेळी नॉर्जिया हा घातक बॉलर समोर होता. तेव्हा आई टीव्ही बंद करून देवासमोर प्रार्थना करत होती. आपल्या मुलाने टीम इंडियासाठी खेळावं, अशी इच्छा देखील साईच्या आईने व्यक्त केली होती.

आणखी वाचा - IND vs SA : जुन्या वाघांसमोर नव्या छाव्यांची 'कसोटी', बीसीसीआयने घेतले 10 बेधडक निर्णय!

दरम्यान, 2022 च्या आयपीएलमध्ये सुदर्शनने 14 चौकार आणि तीन षटकार मारले होते, तर 2023 मध्ये त्याने 33 चौकार आणि 12 षटकार मारले होते. त्याने आयपीएलमधील 13 सामन्यांमध्ये दोन हंगामात 46.09 च्या सरासरीने आणि 137.03 च्या स्ट्राइक रेटने 507 धावा केल्या आहेत. यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश आहे. एकूणच, सुदर्शनने T20 मध्ये 31 सामन्यांमध्ये 37.53 च्या सरासरीने आणि 125.61 च्या स्ट्राइक रेटने 976 धावा केल्या आहेत.