ज्येष्ठ विकेटकीपरची प्रकृती बिघडली, तातडीनं रुग्णालयात दाखल

विकेटकीपरला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.

Updated: Feb 24, 2022, 06:54 PM IST
ज्येष्ठ विकेटकीपरची प्रकृती बिघडली, तातडीनं रुग्णालयात दाखल title=

मुंबई: क्रीडा विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दिग्गज क्रिकेटर आणि विकेटकीपरची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यामुळे तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. विकेटकीपरला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज विकेटकीपर रॉड मार्श यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांची टीम सध्या त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. मार्श हे सर्वात उत्तम आणि धडाकेबाज फलंदाजांमधील एक आहेत. 

हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मार्श हे 74 वर्षांचे आहेत. बुल्स मास्टर्स चॅरिटी कार्यक्रमाच्या आयोजकांनी त्यांना रुग्णालयात तातडीनं दाखल केलं.

आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार ही गोष्ट खूप निराशाजन आहे. रॉड सकाळी 10 वाजून 5 मिनिटांनी आले होते. कारमधून त्यांनी फोन केला. त्यांना बियर घ्यायची होती. पण कारमध्ये त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार रुग्णावाहिकेची प्रतिक्षा केली असती तर कदाचित उशीर झाला असता. वेळेत ते पोहोचू शकले त्यामुळे उपचार करणं शक्य झालं. 

सध्या मार्श यांच्या प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी ऑस्ट्रेलियासाठी 1970 आणि 1984 मध्ये 96 कसोटी सामने खेळून 355 कॅच पकडले आहेत. त्यांनी निवड समितीमध्ये देखील काम केलं आहे.