IND vs SL 1st T20I | श्रीलंकेचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय, टीम इंडियाकडून या खेळाडूचं पदार्पण

पहिल्या टी 20 सामन्यात श्रीलंकेने (IND vs SL 1st T20I) टॉस जिंकला आहे. लंकेने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेत टीम इंडिया बॅटिंगसाठी भाग पाडले आहे.     

Updated: Feb 24, 2022, 07:09 PM IST
IND vs SL 1st T20I | श्रीलंकेचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय, टीम इंडियाकडून या खेळाडूचं पदार्पण title=
छाया सौजन्य : बीसीसीआय

लखनऊ : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका (IND vs SL 1st T20I)  यांच्यात पहिला टी 20 सामना खेळवण्यात येणार आहे. या पहिल्या टी 20 सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकला आहे. लंकेने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेत टीम इंडिया बॅटिंगसाठी भाग पाडले आहे. (ind vs sl 1st t20i sri lanka win toss and elect bowling first deepak hudda makes his debut see mplaying eleven boath team at lucknow)

दीपक हुड्डाचं टी 20 डेब्यू

टीम मॅनेजमेंटने श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यासाठी युवा खेळाडूला पदार्पणाची संधी दिली आहे. टीम मॅनेजमेंटने दीपक हुड्डाला प्लेइंग इलेव्हनची संधी दिली आहे. कॅप्टन रोहितने दीपकला कॅप देत त्याचं टीममध्ये स्वागत केलं.  विशेष म्हणजे विंडिज विरुद्धच्या वनडे मालिकेतून दीपकने एकदिवसीय पदार्पण केलं होतं.

आकडे कोणाच्या बाजूने?

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात आतापर्यंत 22 टी सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये टीम इंडियाचा वरचष्मा राहिला आहे. टीम इंडियाने 14 सामन्यात श्रीलंकेवर विजय मिळवला आहे. तर श्रीलंकेने 7 सामन्यात भारतावर विजय मिळवला आहे.  

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन :  रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, दीपक हुडा, वेंकटेश अय्यर, रवींद्र जाडेजा, हार्दिक पटेल, भुवनेश्वर कुमार, जस्प्रीत बुमराह आणि यूजवेंद्र चहल. 

श्रीलंका प्लेइंग इलेव्हन : पथुम निसानका, कामिल मिशारा, चरित असलंका, दिनेश चांदीमल (विकेटकीपर), जेनिथ लियानागे, दासुन शनाका (कॅप्टन), चमिका करुणारत्ने, जेफरी वेंडरसे, प्रवीण जयविक्रमा, दुशमंथा चमीरा आणि लाहिरु कुमारा.