मिथाली राज झाली जगात सर्वाधिक धावा काढणारी क्रिकेटपटू

 भारताची कर्णधार मिथाली राज हिने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे.   वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा बनविणाऱ्या महिलांच्या यादीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jul 12, 2017, 05:33 PM IST
 मिथाली राज झाली जगात सर्वाधिक धावा काढणारी क्रिकेटपटू  title=

 लिसेस्टर :  भारताची कर्णधार मिथाली राज हिने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे.   वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा बनविणाऱ्या महिलांच्या यादीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. 

 
या सामन्यापूर्वी तिला हा विक्रम गाठण्यासाठी ३४ धावांची गरज होती.  तिने या सामन्यात ३४ धावा केल्यावर ती जगातील सर्वाधिक धावा करणारी महिला झाली आहे. ऑस्ट्रेलिय विरूद्धच्या सामन्यात तिने ६९ धावांवर बाद झाली. आपल्या खेळीत तीने ४ चौकार आणि एक षटकार लगावला.  

यापूर्वी ५९९२ धावांसह  इंग्लंडची कारलोट एडवर्ड्स प्रथम क्रमांकावर होती.  एडवर्ड्सने हा विक्रम १९१ सामने खेळत केला आहे.  मिथालीने हा विक्रम केल्यानंतर सर्वाधिक विकेट घेणारी जुलन गोस्वामी आणि सर्वाधिक धावा काढणारी मिथाली अशा दोन्ही भारतीय खेळाडू झाल्या आहेत. 

मिथालीने आतापर्यंत १८३ सामन्यात १६४ इनिंग खेळत ४२ वेळा नाबाद राहत ६०१५ धावा काढल्या आहेत. यात ४९ अर्धशतकं आणि पाच शतके झळकावली आहेत. तीने ५१.८१ च्या सरासरीने धावा काढल्या आहेत. तिची वन डेमधील सर्वाधिक धावसंख्या ११४ आहे.