World cup 2019 मध्येही 'विराट'सेना म्हणते 'स्टाईल मे रहने का....'

यंदाच्या क्रिकेट विश्वचषकात पहिल्याच सामन्यापासून भारीय क्रिकेट संघाची दमदार कामगिरी पाहायला मिळाली. 

Updated: Jun 20, 2019, 12:41 PM IST
World cup 2019 मध्येही 'विराट'सेना म्हणते 'स्टाईल मे रहने का....'  title=

मुंबई : यंदाच्या क्रिकेट विश्वचषकात पहिल्याच सामन्यापासून भारीय क्रिकेट संघाची दमदार कामगिरी पाहायला मिळाली. याच कामगिरीच्या बळावर संघाने आतापर्यंत विजयाला वेळोवेळी गवसणी घातली आहे. याच वातावरणात पाकिस्तानला नमवल्यानंतर भारतीय खेळाडूंना  काही दिवसांची उसंत मिळाली. 

सुट्टीचे हेच दिवस सर्वच खेळाडूंनी अगदी चांगल्या पद्धतीने मार्गी लावले. एकिकडे कर्णधार विराट कोहली त्याची पत्नी अनुष्का शर्मा हिच्यासोबत वेळ व्यतीत करताना दिसला. तर, दुसरीकडे संघातील इतर खेळाडू म्हणजेच हार्दिक पांड्या, युझवेंद्र चहल इतकच नव्हे तर महेंद्रसिंह धोनीने स्वत:च्या लूकमध्ये काही बदल करण्याला प्राधान्य दिलं. 

भारतीय संघातील या खेळाडूंनीही नवी हेअरस्टाईल केली आहे. सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट आलिम हकिम यानेही त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या स्टार खेळाडूंसोबतचे काही फोटो शेअर केले. ज्यामध्ये तो त्यांना नवे लूक देत असल्याचं पाहायला मिळत आहे. आलिमने या खेळाडूंसोबतच्या अनुभवाविषयी आनंदही व्यक्त केला आहे. फक्त इतकच नव्हे तर, खेळाडूंच्याही चेहऱ्यावर या नव्या लूकचा प्रचंड आनंद दिसत आहे. 

 
 
 
 

A post shared by Team India (@indiancricketteam) on

भारतीय क्रिकेट संघाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुनही याविषयीची एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये हार्दिक पांड्या, युझवेंद्र चहल, विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी यांचा नवा आणि तितकाच अफलातून लूक पाहायला मिळत आहे. भारताच्या संघातील खेळाडूंचा हा अंदाज पाहता क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतही स्टाईल मे रहने का... असाच काहीसा त्यांचा अंदाज आहे, असं म्हणायला हरकत नाही.