World Cup 2019 : वर्ल्ड कपच्या पहिल्या मॅचमध्ये इंग्लंडचं दक्षिण आफ्रिकेपुढे ३१२ रनचं आव्हान

इंग्लंडच्या ४ खेळाडूंची अर्धशतकं

Updated: May 30, 2019, 07:12 PM IST
World Cup 2019 : वर्ल्ड कपच्या पहिल्या मॅचमध्ये इंग्लंडचं दक्षिण आफ्रिकेपुढे ३१२ रनचं आव्हान title=

लंडन : क्रिकेट वर्ल्ड कपच्या पहिल्या मॅचमध्ये इंग्लंडने मोठी धावसंख्या उभारली आहे. यामुळे  दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ३१२ रनचं आव्हान मिळालं आहे. टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेने पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. यानंतर बॅटिंगला आलेल्या इंग्लंडला ५० ओव्हरमध्ये ३११/८ एवढा स्कोअर करता आला. इंग्लंडकडून ४ खेळाडूंनी अर्धशतकं झळकावली, पण एकाही खेळाडूला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

दक्षिण आफ्रिकेचा लेग स्पिनर इमरान ताहिर याने सुरुवातीलाच इंग्लंडला पहिला धक्का दिला. स्कोअरबोर्डवर १ रन असतानाच जॉनी बेअरस्टो पहिल्या बॉललाच शून्य रनवर आऊट झाला. यानंतर जेसन रॉय आणि जो रूट यांनी इंग्लंडची इनिंग सावरली. जेसन रॉयने ५४ रन आणि रूटने ५१ रन केले. इंग्लंडचा कर्णधार इयन मॉर्गनने ५७ रनची खेळी केली. ऑल राऊंडर बेन स्टोक्सने ७९ बॉलमध्ये सर्वाधिक ८९ रन केले.

दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगीडीने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या, तर इमरान ताहीर आणि कगिसो रबाडाला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. एनडिले पेहलुक्वायोला १ विकेट घेण्यात यश आलं.

दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या टीममध्ये आतापर्यंत एकूण ५९ मॅच खेळवण्यात आल्या आहेत. या ५९ मॅचपैकी इंग्लंडने २६ मॅच जिंकल्या आहेत. तर दक्षिण आफ्रिकेने २९ विजय मिळवला आहे. एक मॅच ही बरोबरीत सुटली तर ३ मॅचचा निकाल लागला नाही. वर्ल्ड कपमध्ये या दोन्ही टीम ६ वेळा समोरसमोर भिडल्या आहेत. यापैकी प्रत्येकी ३ सामने दोन्ही संघांनी जिंकले आहेत.

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा