RCB vs DC Match update : महिला प्रिमीयर लीगमध्ये (WPL 2024)एकामागून एक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. शनिवारच्या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या झंझावाती खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सला शेवटच्या 6 षटकांत 91 धावा करता आल्या आणि कर्णधाराच्या या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर हा संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरला. तर रविवारी दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा क्लोज मॅचमध्ये अवघ्या 1 रनने पराभव करून प्लेऑफचे तिकीट जिंकले. आरसीबीला या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले असेल, परंतु त्यांची यष्टिरक्षक फलंदाज ऋचा घोषने अशी खेळी खेळली ज्यामुळे सर्वांनाच भुरळ पडली. मात्र, शेवटच्या चेंडूवर धावबाद होऊन त्याची खेळी संपुष्टात आली, ज्याने लाखो क्रिकेटप्रेमींची मने तोडली.
रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोरविरूद्ध झालेल्या सामन्यात दिल्ली कैपिटल्सने एका धावाने विजय मिळवला आहे. 10 पॉईंट्स सोबत प्लेऑफचा टप्पा गाठलेला आहे. दिल्ली कॅपिटल्सने या सिझनमधले आपले 7 पैकी 5 मॅचेस जिंकत डब्ल्युपीएल 2024 च्या पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आपली जागा निश्चित केली. दिल्ली आणि मुंबई या दोन्ही संघांचे सारखे गूण असून मुंबई इंडियन्सचा रण रेट दिल्लीपेक्षा चांगला आहे. दिल्ली आणि बॅंगलोर यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्लीने 181 धावा करत बॅंगलोरला 20 ओव्हर्स मध्ये 7 विकेट गमावून 180 धावा बनवू दिल्या आणि फक्त 1 धावाने सामना आपल्या नावावर केला आहे.
विकेटकीपर फलंदाज ऋचा घोष हिने आरसीबीला विजयाजवळ आणलं होतं. परंतु भाग्याने तिचा पाठिंबा दिला नाही आणि शेवटच्या चेंडूवर ती रन आउट झाली. जेव्हा संघाला विजयासाठी केवळ एक चेंडूत दोन धावांची गरज होती, तेव्हा शेवटच्या चेंडूवर रन आउट होण्यापूर्वी ऋचाने 29 चेंडूंमध्ये चार चौकार आणि तीन षटकार लगावून 51 धावा केल्या होत्या. रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोरला (आरसीबी) विजय न मिळवून देऊ शकल्याने ऋचा घोष मैदानाच्या मध्यभागी रडू लागली आणि कॅमेरात हा क्षण कैद झाल्यामूळे सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Richa Ghosh and Shreyanka Patil was devastated and they are heartbroken when RCB lost the match by 1 run.
Feel for them pic.twitter.com/G5kzAYV5ws
CricketMAN2 (@ImTanujSingh) March 10, 2024
ऋचा घोषसह एलिस पेरी (49 धावा), सोफी मोलिनेक्स (33 धावा) आणि सोफी डेव्हिन (26 धावा) यांनीही आरसीबीसाठी महत्त्वपूर्ण खेळी केली होती. दुसऱ्या ओव्हरमध्ये कर्णधार स्मृती मंधानाची विकेट गमावल्यानंतर, मोलिनेक्स आणि पॅरी यांनी दुसऱ्या विकेटसाठी 57 चेंडूंत 80 धावांची दमदार भागीदारी करून संघाला कठिण परिस्थितीतून वाचवले. पेरी बाद झाल्यानंतर मोलिनेक्सही पव्हेलियनला परतली. डेव्हिन आणि ऋचा यांनी चौथ्या विकेटसाठी 32 चेंडूंत 49 धावा करून आरसीबीच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. पण डेव्हिन बाद झाल्यानंतर सर्वांचे लक्ष ऋचावर टिकून होते. शेवटच्या ओव्हरमध्ये जेस जोनासेनविरुद्ध आरसीबीला विजयासाठी 17 धावांची गरज होती. पण 20 व्या ओव्हरमध्ये रिचा घोष आरसीबीला जिंकवू शकली नाही आणि दुर्देवाने शेवटच्या बॉलवर ती रण आऊट सूद्धा झाली होती.
या सामन्यापूर्वी, आरसीबीची युवा ऑफ स्पिनर श्रेयंका पाटिलने चांगली कामगिरी करत 4 ओव्हर्समध्ये 4 विकेट्स मिळवले होते. दिल्ली कॅपिटल्ससाठी, रॉड्रिग्सने स्पीनविरुद्ध स्वीप, कट, पुल आणि ड्राइव्हसह 34 चेंडूंत 8 चौकार आणि 1 षटकारासह 58 धावा केल्या. जेमिमा आणि कॅप्सेने 10 ओव्हर्समध्ये तिसऱ्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी केली होती. तर कर्णधार मेग लॅनिंग आणि शेफाली वर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी करून टीमला चांगली सुरुवात दिली होती, परंतु दोघीही या सामान्यात लवकरच बाद झाल्या.