मुंबई ( विशाल सवने ) : पत्रकार बोरिया मजूमदार( Boria Majumdar) यांना BCCI ने क्लिन बोल्ड केलंय. त्यांच्यावर 2 वर्षाचा बॅन
लावण्यात आलाय. क्रिकेटपटू ऋद्धिमान साह (Wriddhiman Saha ) याच्यासोबत वाद झाल्यानंतर BCCI कडून कठोर कारवाई करण्यात आली आहे.
ऋद्धिमान साह आणि बोरिया मजूमदार वाद नेमका काय?
ऋद्धिमान साहाकडे पत्रकार बोरिया मजूमदार यांनी मुलाखतीसाठी वेळ मागितला होता. मात्र साहाने या मागणीचं कोणतही उत्तर बोरिया मजूमदार यांना दिलं नाही. यावर नाराज होत बोरिया यांनी साहाला मेसेज केले होते.
या मेसेजचे स्क्रिन शॉट ऋद्धिमान साहा याने आपल्या ट्विटर हॅण्डलवर शेअर केले होते. साहाच्या समर्थनात विरेंद्र सेहवाग सुद्धा मैदानात उतरला होता.
बोरिया यांनी मेसेजमध्ये नेमकं काय लिहलं होतं...
बोरिया मजूमदार यांनी आपल्या मेसेजमध्ये लिहलं होतं की, "माझ्या सोबत इंटरव्यू करणं खूप चांगलं असेल; ते एका यष्टीरक्षकाची निवड करतात जो सर्वोत्तम असतो. पण तुम्ही 11 पत्रकार निवडण्याचा प्रयत्न करता. हे माझ्या दृष्टीने चुकीचं आहे.
तुम्ही अशा व्यक्तीला निवडा जो तुमची मदत करेल" इतकं बोलून बोरिया थांबले नाहीत तर पुन्हा एक मेसेज केला. त्यात ते म्हणतात. "तू फोन नाही केलास; मी पुन्हा कधीच तुझी मुलाखत घेणार नाही, मी अपमान सहन करत नाही. हे माझ्या नेहमी ध्यानात असेल. तू असं करायला नको होतं"
ऋद्धिमान साहने हा घडला प्रकार ट्विटर हॅण्डलवर शेअर केला. या नंतर अनेत दिग्गज क्रिकेटपटुंनी मजूमदार यांच्या या कृत्याचा निषेध नोंदवला आणि मजूमदार यांच्यावर कारवाईची मागणी देखील केली. अखेर BCCI ने चौकशी करुन बोरिया मजूमदार यांना दोन वर्षांचा बॅन लावला आहे.
या दोन वर्षाच्या काळात बोरिया मजूमदार देशात BCCI कडून खेळवली जाणारी कोणतीही अंतरराष्ट्रीय अथवा डेमेस्टिक मॅच कव्हर करु शकणार नाहीत. इतकच नव्हे तर ते क्रिकेटच्या स्टेडिअममध्ये एंट्री देखील करु शकणार नाहीत.