हनीमूनला कुठे जाणार अरुण लाल आणि बुलबुल साहा?

टीम इंडियाचे माजी क्रिकेटर आणि समालोचक अरुण लाल (Arun Lal) हे सध्या त्यांच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे.   

Updated: May 4, 2022, 04:23 PM IST
हनीमूनला कुठे जाणार अरुण लाल आणि बुलबुल साहा? title=

मुंबई : टीम इंडियाचे माजी क्रिकेटर आणि समालोचक अरुण लाल (Arun Lal) हे सध्या त्यांच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे. अरुण लाल यांनी 2 मे ला त्यांची मैत्रीण बुलबल साहासोबत दुसरं लग्न केलं. विशेष म्हणजे अरुण लाल आणि बुलबल (Bulbul Saha) यांच्या दोघात 28 वर्षांचा फरक आहे. त्यातही  लाल यांनी पहिल्या पत्नीच्या परवानगीने दुसरं लग्न केलं, यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. दरम्यान लग्नानंतर हनीमूनला कुठे जाणार, असा सवाल लाल आणि बुलबुल यांना विचारण्यात आला. यावर लाल यांनी दिलेलं उत्तर हे आश्चर्यकारक होतं. (where will arun lal and bulbul saha go on honeymoon)

लाल काय म्हणाले? 

लाल यांनी लग्नानंतर हनीमूनला कुठे जाणार, या प्रश्नावर लाल यांनी आश्चर्यकारक उत्तर दिलं. "रणजी ट्रॉफीच आमचं हनीमून आहे", असं उत्तर लाल यांनी दिलं. 

रणजी ट्रॉफीतील क्वार्टर फायनल सामना हा बंगाल विरुद्ध झारखंड यांच्यात खेळवण्यात येणार आहे. हा सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. लाल हे बंगाल टीमचे हेड कोच आहेत.या सामन्यात बुलबुल पती लाल यांचा उत्साह वाढवताना दिसेल. 

लाल यांच्याबद्दल थोडक्यात

लाल यांचा जन्म 1955 मध्ये उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे झाला. अरुणने कॉमेंट्रीमध्येही भाग्य आजमावलं. मात्र 2016 मध्ये कॅन्सरचं निदान झाले. त्यामुळे लाल यांनी कॉमेंट्री सोडली. लाल बंगाल क्रिकेट संघाचे प्रशिक्षकही राहिले आहेत.

लाल यांनी 1982 ते 89 दरम्यान एकूण 16 कसोटी आणि 13 एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व केलं आहे. लाल यांनी यादरम्यान कसोटीत 729 आणि वनडेमध्ये 122 धावा केल्या. लाल यांनी टेस्टमध्ये 6 आणि वनडेत 1 अर्धशतक झळकावलं.