अनुष्का आणि वामिका बेडरूमच्या बाल्कनीतून पाहताय विराटला, शेअर केला फोटो

अनुष्का शर्माने आपल्या बेडरूमच्या बाल्कनीतून खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केला.

Updated: Jun 20, 2021, 01:48 PM IST
अनुष्का आणि वामिका बेडरूमच्या बाल्कनीतून पाहताय विराटला, शेअर केला फोटो

मुंबई: भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सुरू आहे. पवसामुळे एक दिवस सामन्याला उशीर झाला तर 19 जूनला म्हणजे पहिल्या दिवशी देखील हवामान खराब झाल्यानं खेळ लवकर थांबवावा लागला. 

पहिल्या दिवशी टीम इंडियाने 3 गडी गमावून 146 धावा केल्या आहेत. अभिनेत्री अनुष्का आणि वामिका बेडरूमच्या बाल्कनीतून भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना पाहात आहेत. 

अनुष्का शर्माने बेडरूमच्या बाल्कनीतून दिसणारं दृश्यं कॅमेऱ्यात कैद करत सोशल मीडियावर शेअर केलं. या फोटोला चाहत्यांनाही खूप आवडला. बेडरूमच्या बाल्कनीतून अनुष्कानं टॉस होताना पाहिला.

य़ापूर्वी अनुष्कासह क्रिकेटप्रेमींनी 18 जूनला पाऊस पडल्यानं निराशा व्यक्त केली. त्यामुळे पुढचा खेळ चांगला व्हावा यासाठी तिच्य़ासह क्रिकेटप्रेमींनी सोशल मीडियावर प्रार्थना केली होती. टीम इंडियाची सुरुवात ठिकठिक झाली असतली तरी आज होणाऱ्या सामन्यात पुन्हा एकदा जोशानं मैदानात उतरेल अशी अपेक्षा आहे. सर्वांचं या कसोटी सामन्याकडे लक्ष आहे.