World Test Championship Points Table: पोर्ट ऑफ स्पेन (Port of Spain) येथे खेळला गेलेला भारत आणि वेस्ट इंडिज (West Indies vs India) यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामना पावसामुळे ड्रॉ करण्यात आला. पाचव्या दिवसाचा जवळपास 5 तासांचा खेळ पावसामुळे वाया गेल्याने अखेरच्या दिवशीचा खेळ रद्द करावा लागला. त्यामुळे टीम इंडियाने ही मालिका 1-0 ने खिश्यात घातली आहे. अखेरच्या दिवशी वेस्ट इंडिजला सामना जिंकण्यासाठी 289 धावांची गरज होती. आता तर आता पाचव्या दिवशी आणखी 8 विकेट घेऊन भारताला सिरीज 2-0 अशी जिंकता आली असती. मात्र, पावसाने विजयावर पाणी सोडलं.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ही कसोटी अनिर्णित राहिल्यामुळे टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 स्पर्धेत खूप नुकसान सहन करावं लागलं. सध्याच्या गुणतालिकेत पाकिस्तानने भारताला मागे टाकत अव्वल स्थान गाठलं आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी हा मोठा झटका असल्याचं मानलं जातंय. त्यामुळे आता पावसाने भारताचा गेम केला आणि पाकिस्तानची चांदी केली, असं सोशल मीडियावर मत मांडलं जात आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यात भारताला लाजीरवाणा पराभव स्विकारावा लागला. त्यानंतर आता पुढील दोन वर्षासाठी म्हणजेच 2023 ते 2025 या कालावधीसाठीची स्पर्धा नव्याने सुरू झाली आहे. भारतीय संघाने 2023 ते 2025 या कालावधीसाठीच्या स्पर्धेची सुरुवात वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेने केलीये. त्यामुळे आता आगामी प्रत्येक सामना टीम इंडियासाठी महत्त्वाचा असणार आहे.
दरम्यान, भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 27 जुलै रोजी खेळवला जाणार आहे. त्यामुळे आता वनडे मालिका कोणाच्या पारड्यात पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकुर, आर जडेजा, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनादकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.
शाई होप (कर्णधार), रोवमन पॉवेल (उप-कर्णधार), अॅलिक अथानाझ, यानिक कारिया, केसी कार्टी, डॉमिनिक ड्रेक्स, शिमरॉन हेटमायर, अल्झारी जोसेफ, ब्रेंडन किंग, काइल मेयर्स, गुडाकेश मोटी, जॅडन सील्स, रोमॅरियो शेफर्ड, केव्हिन सिनियर, केव्हिन सील्स.