close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

WWE: रोमन रेन्सच्या 'सुपर पंच'पुढे बॉबी लॅश्ले गारद (व्हिडिओ)

 रोमन्स हा डब्ल्यूडब्ल्यूईमधील सध्याचा वजनदार घोडा 

Updated: Jul 25, 2018, 02:56 PM IST
WWE: रोमन रेन्सच्या 'सुपर पंच'पुढे बॉबी लॅश्ले गारद (व्हिडिओ)
छायाचित्र सौजन्य: युट्युब व्हिडिओ स्क्रिनशॉट

नवी दिल्ली: डब्ल्यूडब्ल्यूईच्या चाहत्यांना गेले काही दिवस ज्याची उत्सुकता होती तो सामना अखेर पार पडला. गेले काही दिवस डब्ल्यूडब्ल्यूई स्टार रोमन रेन्स आणि बॉबी लॅश्ले यांच्यातील संघर्ष पाहता चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मात्र, या सामन्यात रोमन रेन्सचा 'सुपर पंच' अखेर बलाढ्य बॉबी लॅश्लेवर भारी पडला. सामना रोमन रेन्सनेच जिंकला. हा एक मोठा सामना होता. कारण या सामन्यात जो जिंकेल त्याची थेट लढाई यूनिवर्सल टायटलसाठी ब्रॉक लेस्नरसोबत होणार होती. आता हा सामना रोमन्स विरूद्ध ब्रोक असा होईल. हा सामनाही उत्कंटावर्धक होईल यात शंका नाही.

 रोमन्स हा डब्ल्यूडब्ल्यूईमधील सध्याचा वजनदार घोडा 

याच आठवड्यात रोमन विरूद्ध लॅश्ले हा सामना झाला. रोमन्स हा डब्ल्यूडब्ल्यूईमधील सध्याचा वजनदार घोडा असल्यामुळे त्याचे चाहतेही त्याच्या विजयाची आस बाळगून होते. चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करत मग रोमन रेन्सनेही जोरदार खेळी केली. एकामागून एक असे शानदार मूव्ह दाखवत आपली जबरदस्त खेळी दाखवली. बॉबीला मात्र चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत. दोघांमध्ये सुमारे १५ मिनिटे लढत चालली. अखेर रोमन्सने शेवटच्या क्षणी दिलेला सुपर पंच कामी आला ज्यात बॉबी गारद झाला. दरम्यान, रोमनने सुपर पंचसोबत स्पियरही दिला. त्यामुळे बॉबी पूरता लोळागोळा झाला.

आता सामना थेट ब्रॉकसोबतच

दरम्यान, आता रोमन विरूद्ध ब्रोक हा सामना १९ जुलैला होणार आहे. लेसनरने २ एप्रिल २०१७ला युनिव्हर्सल टायटल जिंकले होते. २०१७ पासून कोणत्याही रेसलर्सला ब्रोककडून हे टायटल खेचता आले नाही. त्यामुळे आता रोमन्स ब्रॉकला पराभूत करण्यात यशस्वी ठरणार की, ब्रॉक टायटल कायम ठेवणार याबाबत उत्सुकता आहे.