मैदानाबाहेर विकायचा पाणीपुरी, भारतीय क्रिकेट संघात निवड

कधी उपाशी झोपायचा पण आज सचिन तेंडुलकरचा मुलगा त्याचा सहकारी

Updated: Jul 10, 2018, 02:17 PM IST
मैदानाबाहेर विकायचा पाणीपुरी, भारतीय क्रिकेट संघात निवड

मुंबई : मुंबईच्या मैदानाबाहेर पाणीपुरी विकणाऱ्या तरुणाची चक्क भारताच्या अंडर-१९ संघात निवड झाली आहे. यशस्वी जयस्वाल असं या तरुण खेळाडूचं नाव असून तो मुळचा उत्तर प्रदेशचा आहे पाणीपुरी विकत त्यानं भारताच्या अंडर-१९ संघात जागा मिळवण्यापर्यंत मजल मारली आहे. आता श्रीलंकेत होणाऱ्या सामन्यांमध्ये तो आपली कमाल दाखवणार आहे. विशेष म्हणजे सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा संघातला त्याचा सहकारी आहे. संघर्ष आणि मेहनत करुन माणूस कोणत्याही शिखरावर पोहोचू शकतो, हेच यशस्वीनं सिद्ध करून दाखवलंय.

क्रिकेटसाठी मुंबईत आलेला यशस्वी जयस्वाल याला घरातूनही पाठिंबा होता. काळबादेवी येथील एका डेअरीमध्ये तो रात्री झोपायचा. त्याचे एक नातेवाईक वरळीमध्ये राहतात. पण त्यांचं घर खूप लहान होतं. त्यांनतर त्याच्या नातेवाईकाने 'मुस्लीम युनायटेड क्लब'कडे मदत मागितली त्यानंतर त्यांनी यशस्वीला एका टेंटमध्ये राहण्याची परवानगी दिली.

यशस्वीने म्हटलं की, मी टेंटमध्ये यासाठी गेलो कारण मला डेअरीतून काढून टाकण्यात आलं होतं. संपूर्ण दिवस क्रिकेट खेळ्यानंतर मला आरामाची गरज होती. एक दिवस त्यांनी माझं सामान बाहेर फेकून दिलं. कारण मी त्य़ांची मदत करु शकत नव्हतो'... यांनतर तीन वर्ष यशस्वी टेंटमध्ये राहिला. वडील गरज असेल तसे पैसे पाठवत होते. पण यशस्वीला अधिक पैशांची गरज होती म्हणून तो आझाद मैदानमध्ये राम लीला दरम्यान पाणीपुरी आणि फळं विकायचा.

यशस्वीने म्हटलं की, 'रामलीला दरम्यान त्याने चांगले पैसे कमवले. पण माझी अशी इच्छा नव्हती की माझ्या सहकाऱ्यांनी पाणीपुरी खाण्यासाठी माझ्याकडे यावं'. यशस्वीने उपाशी राहूनही दिवस काढले. प्रत्येक दिवशी तो मेणबत्तीच्या प्रकाशात जेवायचा. रात्रीच्या वेळी शौचालयात जायचा. यशस्वी मिडल ऑर्डर बॅट्समन आहे. लोकल कोच ज्वाला सिंह यांनी जेव्हा त्याला पाहिलं आणि त्यांची ओळख झाली तेव्हापासून त्याने अंडर क्रिकेट खेळणं सुरु केलं. आता तो भारताच्या अंडर-19 टीममध्ये खेळणार आहे. सध्या तो कादमवाडी येथे एका चाळीत राहतो. 

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यांच्यासोबत यशस्वी आता ड्रेसिंग रूम शेअर करतो. मुंबई अंडर-19 चे कोच सतीष सामंत यांनी म्हटलं की, 'तो गोलंदाजांचं डोकं वाचतो... आणि त्यानुसार शॉट खेळतो. अंडर-19 मध्ये लवकरच त्याने आपली जागा पक्की केली. तो असे शॉट्स खेळतो जो इतर कोणीच खेळू शकत नाही. त्याच्याकडे ना स्मार्टफोन ना व्हॉट्सअॅप... इतर सगळे मुलं स्मार्टफोन वापरतात. पण, तो येणाऱ्या काळात मुंबईचा खूप मोठा खेळाडू होऊ शकतो.'

Image result for yashasvi jaiswal zee

यशस्वीने म्हटलं की, तुम्ही क्रिकेटमध्ये मानसिक ताणावर चर्चा करतात पण मी तर रोजच माझ्या आयुष्यात 'ताण' सहन केलाय ज्यामुळे मी अधिक मजबूत झालो. मला माहिती आहे मी रन बनवू शकतो आणि विकेटदेखील काढू शकतो. सुरुवातीला मी खूप बेशरम होतो. जेव्हा टीममधील मुलांसोबत जेवणासाठी जायचो तेव्हा माझ्या खिशात पैसे नसायचे. मी त्यांना सांगायचो माझ्याकडे पैसे नाही पण मला खूप भूक लागली आहे'.