मुंबई: रोड सेफ्टी वर्ल्ड टी 20 सीरिजमध्ये आपल्या दमदार कामगिरीमुळे युवराज सिंह खूप चर्चेत होता. मात्र आता हा रुख बदलला असून तो वेगळ्याच कारणासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. बऱ्याचवेळा क्रिकेटर्स आपल्या हटके लूक, स्टाईलमुळे चर्चेचा विषय असतात मात्र युवराज सिंहचा हा लूक विशेष चाहत्यांना आवडला नसल्याचं पाहायला मिळालं आहे.
युवराज सिंहचे चाहतेच नाही तर क्रिकेटर्सही त्याच्या या लूकवर भन्नाट कमेंट्स करत आहे. युवराज सिंहनं आपली हेअरस्टाईल बदलली आहे. त्याने आपले केस वाढवले असून त्यांना कलर केलं आहे. त्याचा हा अजब लूक अचानक समोर आल्यानंतर इतर क्रिकेटपटूदेखील अवाक झाले.
इरफान पठाननं बादशाह अशी कमेंट केली आहे. रवींद्र जडेजानं क्या थे और क्या हो गये अशी कमेंट केली आहे. युवराजनं हो किंवा नाही किंवा सांगता येत नाही असं कॅप्शन देत इमोजी शेअर केले आहेत.
रोड सेफ्टी वर्ल्ड टी -20 मालिकेच्या अंतिम सामन्यात युवराज सिंहने41 चेंडूत 60 धावा केल्या आणि श्रीलंका महापुरूषांवर इंडिया लेजेंड्सच्या विजयाची कहाणी लिहिली. अंतिम सामन्यापूर्वी त्याने उपांत्य सामन्यात 20 चेंडूत 49 धावा केल्या होत्या. त्याच षटकात त्याने 4 षटकार ठोकण्याचा विक्रमही केला.