इंटेक्सनचे २००० रुपयांपेक्षाही स्वस्त फोन बाजारात
भारतीय कंपनी इंटेक्सनं टेक्नॉलॉजीनं प्लॅटिनम सीरिजचे फोन बाजारात आणले आहेत. प्लॅटिनम कर्व, प्लॅटिनम मिनी, आणि प्लॅटिनम ए६. कंपनीच्या मते हे फोन खूप स्टायलिश असून त्यांची किंमत अवघ्या दोन हजार रुपयांपेक्षाही कमी आहे.
स्वस्त फोन ज्यांना घ्यायचाय त्यांच्यासाठी हे फोन खूप चांगले आहेत. आधुनिक आणि आकर्षक असे फिचर्स असलेले हे फोन तीन वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये उपलब्ध आहेत. यात ६० केबीपासून १४५ केबीपर्यंत इनबिल्ट मेमरी आहे. तसंच या फोनचे कॅमेरे खूप चांगले असल्याचा दावा कंपनीनं केलाय.
इंटेक्सचा स्मार्टफोन ‘एक्वा आय-४ प्लस’ लॉन्च
माहिती तंत्रज्ञान उत्पादन बनवणाऱ्या इंटेक्स टेक्नॉलॉजी या कंपनीनं स्मार्टफोनच्या यादीत ‘एक्वा आय-४ प्लस’ नावाचा नवीन स्मार्टफोन लॉन्च केलाय. या फोनची किंमत आहे केवळ ७,६०० रुपये. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार ३जी युक्त अशा या हॅण्डसेटमध्ये पाच इंच डिस्प्ले आणि १.२ गीगाहर्ट्सचा ड्यूएल कोर प्रोसेसर आहे.
Dec 29, 2013, 06:07 PM IST