नागपूर अधिवेशन : शेतकरी कर्जमाफी मुद्यावर पुन्हा सरकारला विरोधकांनी घेरले
हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधक पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या इतर मुद्यांवर सरकारला पुन्हा एकदा घेरण्यास सुरुवात केलीय.
Dec 13, 2017, 03:04 PM ISTहिवाळी अधिवेशन : विरोधक शेतकरी कर्जमाफीवर ठार, ८ मोर्चे
हिवाळी अधिवेशनाच्या तिस-या दिवशी विरोधक पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या इतर मुद्यांवर सरकारला पुन्हा एकदा घेरण्याची शक्यता आहे.
Dec 13, 2017, 12:55 PM ISTकर्जमाफी : अजित पवारांची शिवसेनेला सरकार स्थापनेची ऑफर
शेतकरी कर्जमाफीवरुन विधिमंडळात विरोधक चांगलेच आक्रमक झाले. विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेला थेट सत्तास्थापनेची ऑफर दिली.
Jul 25, 2017, 08:29 PM ISTयोगी सरकारप्रमाणे फडणवीस सरकारही करणार शेतकऱ्यांचं कर्ज माफ?
उत्तर प्रदेश प्रमाणे महाराष्ट्र सरकार अल्प कर्ज धारक शेतकऱ्यांचं कर्ज माफ करु शकते. १ लाखापर्यंतच कर्ज सरकारकडून माफ केलं जाऊ शकतं.
Jun 2, 2017, 04:13 PM IST'कर्जमाफी'साठी अजित पवार न्यायालयात जाणार...
कर्जमाफीचा प्रश्न पुढे आल्यानंतर मुख्यमंत्री शेतकरी आत्महत्या करणार नाहीत याची हमी मागतात... पण हेच मुख्यमंत्री राज्यावर नैसर्गिक संकट ओढवणार नाही, याची हमी देतील का? असा सवाल करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही राज्यांना उच्च न्यायालयाने कर्जमाफीचा आदेश दिलाय. त्यामुळं आता महाराष्ट्रातही कर्जमाफीसाठी न्यायालयात जाणार असल्याची माहिती दिलीय. त्यांनी कर्जमाफीच्या मुद्यावरून उर्जित पटेल, अरुंधती भट्टाचार्य यांच्यासह मुख्यमंत्र्यांवर कडाडून टीका केली. उद्योगपतींचे कर्ज भरताना अर्थव्यवस्था कोलमडेल याचा विचार केला नाही का? का झोपा काढत होता? असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
Apr 11, 2017, 07:41 PM ISTसगळ्याच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा : न्यायालय
मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडूमधील सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आदेश दिलेत.
Apr 4, 2017, 08:51 PM ISTकाळ्या कारभारावर पांघरुण घालण्यासाठी कर्ज माफी हवेय - CM
आलिशान गाडीतून फिरुन 'संघर्ष यात्रा' काढणाऱ्या विरोधकांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. बॅंकेतील काळ्या कारभारावर पांघरुण घालण्यासाठी विरोधकांना कर्ज माफी हवेय, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री यांनी केली.
Apr 4, 2017, 06:04 PM IST'कर्जमाफीचा शेतकऱ्यांऐवजी सावाकारांनाच फायदा'
राज्य सरकारनं देऊ केलेल्या कर्जमाफीचा सर्वसामान्य शेतकऱ्यांऐवजी सावाकारांनाच फायदा होणार असल्याचा आरोप, बुलडाणातल्या सावकारग्रस्त शेतकरी समितीनं केला आहे.
Mar 19, 2015, 11:05 AM IST