कोल्हापूर बंद

Kolhapur Violence : आक्षेपार्ह स्टेट्स ठेवाल तर जेल, पोलिसांनी दिला कारवाईचा इशारा

Kolhapur Violence : कोल्हापुरातील परिस्थिती नियंत्रणात आणली गेली आहे. तरी देखील अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावला आहे. पुणे इथून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त आला आहे. आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्यावर बारीक लक्ष असणार आहे. आक्षेपार्ह स्टेटस कोणी ठेवल्याचे आढळयास कारवाई करण्यात येणार आहे.

Jun 8, 2023, 11:17 AM IST

अचानक 'औरंग्या'च्या इतक्या अवलादी कुठून पैदा झाल्या? देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला सवाल

कोल्हापूर बंदला अचानक हिंसक वळण लागलं, आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठिचार्ज करावा लागला, कोणतीही अफवा पसरु नये यासाठी कोल्हापूरमधील इंटरनेट सेवा 31 तासांसाठी बंद करण्यात आली आहे.  

Jun 7, 2023, 05:43 PM IST

कोल्हापुरात तणावपूर्ण शांतता, कायदा हाती घेणाऱ्यांवर कठोर कारवाई - मुख्यमंत्री

Kolhapur Voilence: हिंदुत्त्ववादी संघटनांनी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला हिंसक वळण लागले. हिंदुत्ववादी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. आक्रमक कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला. कोल्हापुरात सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पोलिसांनी म्हटले आहे.

Jun 7, 2023, 02:34 PM IST

'औरंगजेबाची भलावण करणाऱ्यांना महाराष्ट्रात माफी नाही' जनतेने शांतता पाळावी - गृहमंत्री फडणवीसांचं आवाहन

औरंगजेबाच्या स्टेटसचा वाद चिघळला, कोल्हापूरमध्ये पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागलं. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज करावा लागला तर इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. 

Jun 7, 2023, 01:49 PM IST

कोल्हापुरात टोलविरोधी आंदोलनामुळे बंद

कोल्हापुरात टोलविरोधी आंदोलनामुळे पूर्ण शहर आणि जिल्ह्यातही बंद पाळण्यात येणारेए. या बंदमध्ये सर्वसामान्यांसह वाहनचालक आणि रिक्षाचालकही सहभागी होणारेत. सकाळी अकरा वाजता महामोर्चा काढण्यात येणार असून आज शहरातील सर्व व्यवहार ठप्प राहणार आहेत.

Jan 9, 2012, 09:22 AM IST