Kolhapur Violence : कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांकडून बंद दरम्यान हिंसक आंदोलन झाले. त्यामुळे कोल्हापुरात तणाव वाढला होता. आता यापुढे कोणताही तणाव वाढू नये म्हणून पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. औरंगाजेबचे स्टेटस ठेवल्यानंतर मोठा तणाव वाढून आंदोलन झाले. त्यामुळे यापुढे आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्यावर बारीक लक्ष असणार आहे. आक्षेपार्ह स्टेटस कोणी ठेवल्याचे आढळयास कारवाई करण्यात येणार आहे, असे इशारा कोल्हापूर पोलिसांनी दिला आहे.
काल 3 वाजेपर्यंत कोल्हापुरातील परिस्थिती नियंत्रणात आणली गेली आहे. तरी देखील अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावला आहे. पुणे इथून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त आला आहे. आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्यावर बारीक लक्ष असणार आहे. आक्षेपार्ह स्टेटस कोणी ठेवल्याचे आढळयास कारवाई करण्यात येणार आहे. स्टेट्स ठेवणारे सर्व मुले ही कॉलेजची आहेत. कोणी बाहेरुन आले होते का, याचा तपास सुरु आहे. तीन गुन्ह्यांमध्ये 300 ते 400 गुन्हेगार आहेत. आता 36 लोकांना अटक केली आहे.
दरम्यान, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना कोणी स्टेटस ठेवायला सांगितले का याचा सुद्धा तपास केला जात आहे. आक्षेपार्ह सोशल मीडिया अकाउंटजे चालवीत आहेत, त्याचा देखील शोध घेतला जात आहे, अशी माहिती कोल्हापूरचे पोलीस अध्यक्ष महेंद्र पंडित यांनी दिली आहे.
काल झालेल्या दगडफेक आणि तोडफोड प्रकरणी आतापर्यंत 50 हून अधिक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जवळपास 60 हून अधिक जण दगडफेकीत जखमी झालेत. तर अनेक वाहनं, दुकान, टपऱ्या आणि घरांची देखील तोडफोड करण्यात आलीय. शहरातल्या अनेक भागात आजही तणाव कायम आहे. कोल्हापूर शहरानंतर वरणगे पाडळी गावात संतप्त जमावानं तोडफोड केलीय. औरंगजेबचं स्टेटस लाईक करणा-या तरुणाला जाब विचारला गेलेल्या जमावानं हे कृत्यं केलंय. आजही कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागात बंदची घोषणा करण्यात आलीय.
कोल्हापुरात काल झालेल्या घटनेत 60 टक्के लोक बाहेरचे असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच असे प्रकार कोण घडवतंय ते शोधावं असं आव्हानही दिले आहे. अहमदनगर आणि कोल्हापूरमधील घटनेवरून संजय राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.फडणवीस हे कमजोर गृहमंत्री आहेत. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेत मागे पडलाय. औरंग्यांना भाजपकडून ताकद पुरवली जात असल्याचा आरोप राऊतांनी केलाय. तर औरंग्याच्या औलादींचं राऊतांकडूनच समर्थन केलं जात असल्याचं प्रत्युत्तर केशव उपाध्येंनी दिले आहे.