जागतिक विक्रम

Chinmay Prabhu In Guiness World Record PT54S

मुंबई । चिन्मय प्रभूचा पाण्याखाली रुबिक क्युब्स सोडवण्याचा जागतिक विक्रम

मुंबईत मालाड येथे राहणाऱ्या २० वर्षीय चिन्मय प्रभू याने पाण्याखाली रुबिक क्युब्स सोडवण्याचा जागतिक विक्रम केलाय. नवा विक्रम नोंदवण्यासाठी चिन्मयला ४ पिरॅमिक्स म्हणजे रुबिक क्युब्स सोडविणे आवश्यक होते. चिन्मयने फक्त १ मिनिट ४८ सेकंदमध्ये पाण्याखाली राहून एका श्वासात तब्बल नऊ क्युब्स सोडविले.

May 4, 2019, 09:40 PM IST

शेफ विष्णू मनोहर हे जागतिक विक्रमासाठी सज्ज

प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हे जागतिक विक्रमासाठी सज्ज झालेत. शुक्रवारपासून त्यांचा विक्रमाचा प्रयत्न सुरु झालाय. 

Apr 22, 2017, 11:27 PM IST

लंडन ते भारत कार प्रवास, जागतिक विक्रमाची नोंद

लंडन येथील स्थायिक असलेल्या भारूलता कांबळे यांनी युके ते भारत कारने प्रवास करत जागतिक विक्रम केला आहे. 

Nov 19, 2016, 10:29 PM IST

तिरंदाज दीपिका कुमारीची जागतिक विक्रमाशी बरोबरी

चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी विश्वचषक भारतीय तिरंदाज दीपिका कुमारीने अचूक लक्ष्यवेधत जागतिक विक्रमाशी बरोबरी साधली आहे. २१ वर्षीय दीपिकाने तिरंदाजी विश्वचषकात महिलांच्या रिकर्व्ह इव्हेंटमध्ये ७२० पैकी ६८६ गुण मिळवत दक्षिण कोरियाची तिरंदाज को बो बे हिच्या २०१५ सालच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

Apr 27, 2016, 09:30 PM IST

गन्गनम स्टाईलनं बनवला वर्ल्ड रेकॉर्ड...

दक्षिण कोरियाची डान्स स्टाईल म्हणून फारच थोड्या वेळात प्रसिद्ध झालेल्या गन्गनम स्टाईलनं एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केलाय. गन्गनम स्टाईलचा व्हिडिओ आता असा व्हिडिओ आहे ज्याला यूट्यूबवर एक अरबपेक्षा जास्त लोकांनी पाहिलंय.

Dec 22, 2012, 05:05 PM IST