पांढरा पैसा

कृषी मालाच्या व्यवहारातून काळा पैसा केला जातोय पांढरा

नाशिकमध्ये कृषी मालाच्या व्यवहारातून आणि पूजा विधीतून दररोज काळा पैसा पांढरा केला जातोय. कृषी मालासाठी शेतक-यांना पाचशे आणि हजाराच्या चलनातून बाद झालेल्या नोटा दिल्या जात आहेत. या माध्यमातून दररोज पंचवीस कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा केला जातोय. इतकंच नाही, तर धार्मिक पूजा विधीतूनही दररोज मोठ्या प्रमाणात काळ्या पैशांची निर्मिती होतेय.

Dec 13, 2016, 01:28 PM IST

काळापैसा पांढरा करणा-यांना सरकारचा दणका

 नोटबंदीच्या निर्णयानंतर काळापैसा पांढरा करणा-यांना सरकारनं दणका दिला आहे. दुस-याच्या बँक खात्यांच्या आधारे काळा पैसा पांढरा करु पहाणा-यांना 7 वर्षे जेलची हवा खावी लागणार आहे. नव्यानं मंजूर झालेल्या बेनामी ट्रॅन्झॅक्शन कायद्यानुसार ही कारवाई करण्यात येणार आहे.

Nov 21, 2016, 12:20 PM IST

काळा पैसा पांढरा करण्यासाठी देवस्थानांकडे धाव

काळा पैसा पांढरा करण्यासाठी नागरिकांनी आता देवस्थानांकडे आपला मोर्चा वळवलाय. काही मंदिरांमध्ये त्यासाठी फोन आल्याचीही चर्चा आता रंगू लागलीय. तर दुसरीकडे मंदिरांमध्यल्या अधिकृत देणगीत कमालीची घट झाल्याचं पुढं आली आहे.

Nov 10, 2016, 09:46 PM IST