भाजप मेगाभरती

Mumbai Chandrakant Patil PC 18Th Jan 2020 08:22

मुंबई । मेगाभरतीबाबत माध्यमांनी विपर्यास चालवला - चंद्रकांत पाटील

भाजप मेगाभरतीबाबत माध्यमांनी विपर्यास चालवला, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी वादावर पडदा टाकण्याचे काम केले. मात्र, माध्यमांवर खापर फोडले. भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना त्यांनीच केलेल्या वक्तव्यावरुन ४८ तासांत घुमजाव करावे लागले आहे. मात्र, मेगाभरतीच्या निमित्ताने भाजपमधील जुने कार्यकर्ते, नाराज कार्यकर्ते यांना पक्षातील सद्यस्थितीबद्दल बोलण्याची संधीच मिळाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मेगाभारती ही एक चूक होती, यामुळे भाजपची संस्कृती बिघडली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते. त्यानंतर नाराज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मी आधीपासून याला विरोध करत होतो. आता ही मेगाभरती चुकीची होती, हे जाणवत आहे. या मेगाभरतीमुळेच भाजपला पराभवाचा अनेक ठिकाणी सामना करावा लागला आहे. पक्षातील लोकांना संधी मिळाली असती तर आज राज्यात वेगळे चित्र पाहायला मिळाले असते, असा समाचार खडसे यांनी घेतला आहे.

Jan 18, 2020, 08:15 PM IST

'भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट'

 भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

Jan 18, 2020, 07:38 PM IST

भाजप 'मेगाभरती' वक्तव्यावरून चंद्रकांत पाटील यांचा यू टर्न

 मेगाभरती ही चूक होती, असे वक्तव्य करणारे चंद्रकांत पाटील यांनी विधानावर यू टर्न घेतला आहे.

Jan 18, 2020, 04:25 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x