श्रावणाच्या तोंडावर भाजीपाला झाला स्वस्त
शेतक-यांकडून अडत रद्द झाल्यानंतर आता मोठ्या प्रमाणात भाजीपाला मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल होत आहे. पण या भाजीपाल्याला उठावच नसल्याने भाज्यांचे भाव कमी झाले आहेत. भाजीपाला पडून आहे. भाजीपाला नियमनमुक्त केल्याने मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात भाज्यांची आवक होत आहे. आडत रद्द झाल्याने शेतकरी थेट शहरात माल पाठवत आहेत. पण त्याप्रमाणात उठावच नसल्याने भाज्यांचे भाव कमालीचे पडले आहेत. जवळपास 50 टक्क्यांनी भाजीपाल्याचे भाव घसरले आहे.
Jul 28, 2016, 11:30 AM IST