मनपा निवडणूक

झोपडपट्यांवरील कारवाईवरुन मुंबई मनपात सेना-भाजप वाद पेटला

शिवसेना भाजप यांच्यात मुंबई महानगरपालिकेत चांगलाच वाद पेटला. मुंबई महानगपालिकेत माफिया राज असल्याचा आरोप केला जातो आहे. त्याबाबतचं नेमकं सत्य आयुक्तांनी मुंबईकरांसमोर ठेवावं अशा मागणीचं पत्र महापौरांनी आयुक्तांना लिहिलं आहे. तर शिवसेना खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सुनील प्रभू यांनी स्वतः महापालिकेत येऊन झोपडपट्ट्यांवरील कारवाईवरून आयुक्तांची खरडपट्टी काढली. 

Oct 20, 2016, 06:20 PM IST

युतीबाबत भाजपची आता सबुरीची भाषा

एकीकडे शिवसेना नेते आक्रमक झाल्याची चर्चा असतानाच भाजपानं मात्र आता सबुरीची भाषा केली आहे. शिवसेना आणि भाजपाची युती व्हावी याबाबत जिल्हास्तरावर निर्णय होतो. मात्र मुंबईमध्ये युती व्हावी ही भाजपाची इच्छा असल्याचं अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय.

Oct 20, 2016, 06:04 PM IST

आगामी निवडणुकीत सेना स्वबळावर, उद्धव ठाकरेंचे संकेत

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपवर विश्वास ठेवणं कठीण असल्याचा सूर आज मातोश्रीवर झालेल्या शिवेसेनेचे वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत पुढे आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 

Oct 20, 2016, 03:13 PM IST

मुंबईवरच्या वर्चस्वासाठी ठाकरे बंधुंनी कसली कंबर

मुंबईवर असलेलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी ठाकरे बंधुनी कंबर कसली आहे.

Oct 18, 2016, 03:56 PM IST

भाजपने थेट 'मातोश्री'लाच केलं लक्ष्य

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपमध्ये सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोपांची धार दिवसागणिक वाढतेय. भाजपनं तर आता थेट 'मातोश्री'लाच लक्ष्य करण्यास सुरुवात केलीय. शिवसेनेनही भाजपचा हा हल्ला मोडून काढण्याची व्यूहरचना आखली आहे.

May 11, 2016, 01:32 PM IST

मुंबई मनपा निवडणूक भाजप-सेना स्वबळावर लढणार

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप युती होणार का? अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. युती होणं तर तसं कठीण दिसतंय आणि त्याला कारण आहे शिवसेना-भाजपमधील शीतयुद्ध.

Jan 20, 2016, 08:59 PM IST