त्रिवेदींचे जाणे दु:खदायक - पंतप्रधान
रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदींचं राजीनामा नाट्य अखेर संपल. त्रिवेदींचा राजीनामा मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवल्याचं पंतप्रधानांनी लोकसभेतल्या निवेदनात स्पष्ट केले. त्रिवेंदीच्या गच्छतींबाबत दु:ख झाल्याचंही पंतप्रधानांनी नमूद करत ममतांना टोला लगावला.
Mar 19, 2012, 02:15 PM ISTमी कोणाचाही प्यादा नाही - दिनेश त्रिवेदी
रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांना रेल्वे भाववाढ चांगलीच महागात पडली आहे. कारण की, त्यामुळे त्यांचं मंत्रीपद गमवावं लागलं आहे. तसचं भाववाढ केल्याने त्यांच्याविरोधात बोलले जात आहे. तर दुसरीकडे राजीनामा द्यावा लागलेल्या दिनेश त्रिवेदींनी मी कुणाचाही प्यादा नसल्याचं म्हटलं आहे.
Mar 19, 2012, 01:34 PM IST