Santosh Deshmukh Murder Case : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. 'zee 24 तास'च्या 'टू द पॉईंट' या विशेष कार्यक्रमात सुरेश धस नुसता आरोप केला नाही तर मी दिलेली माहिती 100 टक्के खरी ठरणार असा दावा देखील केला आहे. खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक झाल्याचे सागंत त्यांनी हा दावा केला आहे.
संतोष देशमुख यांचे अपहरण केल्यानंतर त्यांला 10 ते 15 गांवामधून फिरवण्यात आले. तब्बल 4 तास संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली. धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी वाल्मिक कराड यांच्यासह बैठक झाली. ज्या कंपनीच्या खंडणीसाठी संतोष देशमुख यांचा खून झाला त्यासाठीची बैठक ही धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी झाली असा खळबळजनक आरोप सुरेश धस यांनी केला. 100 टक्के 'ही' माहिती ठरी ठरणार SIT तपासात सर्व उघडकीस येईल असा देखील सुरेश धस यांचा दावा आहे.
पवनचक्की कंपनीकडे खंडणी मागण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर बैठक झाली होती आणि नंतर निवडणुकीसाठी या कंपनीकडून 50 लाख रुपये घेण्यात आले, असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे.
वाल्मिक कराडला ED ची नोटीस गेलेली आहे. वाल्मिक कराडच्या पत्नीच्या नावार देखील मोठी मालमत्ता जमा आहे. धनंजय मुंडे यांचा राजीना घेण्याचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार अजित पवार यांना आहे. मात्र, धनंजय मुंडे यांच्याजवळील लोक त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्वल निकम यांना लवकराच लवकर नियुक्ती पत्र मिळवून देणे यासाठी माझे सर्व प्रयत्न सुरु आहेत. न्यायालयाकडून देखील याची गांभिर्याने देखल घेण्यात आली आहे.