मराठा आरक्षण

मराठा मोर्चामुळे मुंबईतील शाळांना सुटी जाहीर

मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने शहरातील शाळांना सुटी जाहीर केलेय. त्यामुळे मोर्चामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर पडणारा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

Aug 8, 2017, 02:35 PM IST

१ लाख मराठा मोर्चेकरांना मोफत जेवणाची व्यवस्था

मराठा समाजातर्फे मराठा समाजासाठी आरक्षणासहित विविध प्रलंबित मागण्यासांठी गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठा मूक क्रांती मोर्चे काढण्यात येत आहेत. याच मालिकेतील शेवटचा महामोर्चा मुंबई येथे ९ ऑगस्ट रोजी होणार आहे. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर हरियाणा आणि गुजरात राज्यातूनही मराठा बांधव या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती मोर्चाच्या संयोजकांनी दिली होती.

Aug 8, 2017, 10:58 AM IST

मराठा आरक्षणासंदर्भात आमदार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

  मराठा समाजाचे आमदार आणि संघटनांचे प्रतिनिधी गुरुवारी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट आहे. 

Aug 1, 2017, 09:27 PM IST

मराठा आरक्षणाचं घोंगड भिजत पडण्याची शक्यता

मराठा आरक्षणाचा चेंडू आता मागासवर्गीय आयोगाच्या कोर्टात टोलवला जाण्याची शक्यता आहे. असं झाल्यास नजिकच्या काळात मराठा आरक्षणाचं घोंगडं भिजतच पडेल, अशी चर्चा आहे. 

May 4, 2017, 05:35 PM IST

मराठा आरक्षणाचा विषय मागासवर्गीय आयोगाकडे?

मराठा आरक्षण विषय मागासवर्गीय आयोगाकडे सोपण्यास हरकत नसल्याची भूमिका राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात मांडली होती. 

May 2, 2017, 11:02 PM IST

मराठा आरक्षण : राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश

मराठा आरक्षण विषय मागासवर्गीय आयोगाकडे सोपण्यास हरकत नसल्याची भूमिका राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात मांडली होती. त्यावरून राज्य सरकारची भूमिका स्पष्ट होत नाही, हा मुद्दा प्रवर्ग मागास वर्गीय आयोगाकडे द्यावा की नाही, याचे स्पष्टीकरण सरकारने गुरूवारपर्यंत देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

May 2, 2017, 07:13 PM IST

मराठा आरक्षणाची याचिका कुठे चालवायची? उच्च न्यायालयाचा सवाल

मराठा आरक्षण विषय मुंबई न्यायालयात चालावयाचा की राज्य सरकारने स्थापन केलेल्या आयोगासमोर हे २९ मार्च पर्यंत सर्व याचिकाकर्त्यांनी आणि राज्य सरकारने निर्णय घेवून मुंबई उच्च न्यायालयाला कळवावे, असे आदेश हायकोर्टानं दिलेत.  

Feb 27, 2017, 07:14 PM IST

मराठा आरक्षणावरील याचिकेवर अंतिम सुनावणी

मराठा आरक्षणावरील याचिकेवर अंतिम सुनावणी आता 27 फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याचं मुंबई हायकोर्टानं सष्ट केले आहे. त्यामुळं मार्च महिन्यात मराठा आरक्षणासंदर्भात निकाल येऊ शकतो. 

Jan 31, 2017, 06:31 PM IST

मराठा आरक्षणासाठी चक्का जाम, राज्यातील महामार्ग रोखल्याने कोंडी

मराठा आरक्षणासाठी मुंबईसह राज्यामध्ये मराठा समाजातर्फे आज चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. मुंबईत दहिसर टोल नाक्यावर 500 ते 600 लोकांनी आंदोलनात भाग घेतला. त्यामुळं वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतुक कोंडी झाली होती. 

Jan 31, 2017, 04:23 PM IST

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही

मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय करण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. 

Dec 9, 2016, 07:26 PM IST