रतन टाटा निवृत्त

टाटा समूहाची आजपासून सायरस मिस्त्रींकडे धुरा

कोट्यवधींची उलाढाल असलेल्या टाटा समूहाची धुरा तब्बल दोन दशके यशस्वीपणे संभाळल्यानंतर शुक्रवारी रतन टाटा ७५व्या वाढदिवशी अध्यक्षपदावरून निवृत्त झाले. टाटांची जबाबदारी आजपासून सायरस मिस्त्री हाती घेणार आहेत.

Dec 31, 2012, 09:46 AM IST

टाटांच्या छोट्या कंपन्या कर्जात बुडाल्यात

देशातला सर्वात जुना उद्योगसमूह असलेल्या टाटा ग्रुपचं नेतृत्व आता रतन टाटांकडून सायरस मिस्त्रींकडे आले. हे नेतृत्व येत असताना सायरस यांच्यासमोर सर्वात मोठं आव्हान असेल, ते ग्रुपमधल्या महत्त्वाच्या कंपन्यांवर असलेलं कर्ज कमी करण्याचं. छोट्या कंपन्या कर्जात बुडालेल्या आहेत.

Dec 27, 2012, 04:36 PM IST

रतन टाटांची सूत्रं सायरस मिस्त्रींकडे

उद्योगपती रतन टाटा यांनी निवृत्ती घेतली. त्यामुळे आदी जाहीर केल्याप्रमाणे त्यांचा पदभार रतन टाटांच्या विश्वासातील सायरस पी. मिस्त्री यांच्याकडे सोपविण्यात आलाय.

Dec 27, 2012, 03:05 PM IST

२८ डिसेंबरला सायरस स्वीकारणार `टाटा सन्स`च्या अध्यक्षपदाची सूत्रं

टाटा समूहातील कंपन्यांची मूळ कंपनी ‘टाटा सन्स’नं सायरस पी. मिस्त्री यांच्याकडे आपल्या अध्यक्षपदाचा भार सोपवलाय. मंगळवारी ही घोषणा केली गेलीय.

Dec 19, 2012, 07:55 AM IST