विधानसभा निवडणूक २०१४

जम्मू-काश्मीरचा सरताज कुणाच्या शिरावर?

जम्मू-काश्मीरचा सरताज कुणाच्या शिरावर विराजमान होणार, हे अजून गुलदस्त्यातच आहे. कारण पीडीपी ३० जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आलाय. तर भाजपनं कधी नव्हे ते २५ जागा जिंकून जोरदार मुसंडी मारलीय. मात्र त्रिशंकू विधानसभेमुळं कुणाचं सरकार बनणार, हे कोडं अजून सुटलेलं नाही.

Dec 23, 2014, 07:53 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये त्रिशंकू अवस्था

जम्मू-काश्मीरमध्ये कुणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू अवस्था निर्माण झालीये. जम्मू-काश्मीरमध्येही मोदींची जादू चालली आहे.

Dec 23, 2014, 03:48 PM IST

झारखंड, काश्मीरमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदानास सुरूवात

झारखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदानास रविवारी सकाळी सुरूवात झाली. जम्मू-काश्मीरमध्ये १८ जागांसाठी मतदान होत असून १८२ उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद होईल. १८९० मतदान केंद्रावर १४ लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

Dec 14, 2014, 11:07 AM IST

काश्मीर, झारखंडमध्ये मतदानाला सुरुवात

जम्मू काश्मीर आणि झारखंड राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मंगळवारी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. काश्मीरमधील १५ आणि झारखंडमधील १३ मतदारसंघात हे मतदान होत आहे.

Nov 25, 2014, 11:49 AM IST

मोदींवरील टीका खपवून घेतली जाणार नाही- नितीन गडकरी

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शिवसेनेकडून करण्यात येणारी टीका यापुढं खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिलाय. 

Oct 15, 2014, 07:29 PM IST

राज्यात ६४ टक्के मतदान - निवडणूक आयोग

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज झालेल्या मतदानात, सुमारे 64 टक्के मतदानाची नोंद झालीय. सहा वाजेपर्यंत 62 टक्क्याच्या आसपास मतदान होईल, असा प्राथमिक अंदाज केंद्रीय निवडणूक आयोगानं व्यक्त केला होता.

Oct 15, 2014, 07:33 AM IST

शहरातला मतदारच ठरवणार विधानसभेचा कौल?

 लोकसभा निवडणुकीत मतदारांनी भरभरुन दान टाकलं. नव मतदारांची ताकद काय असते, तेही याच निवडणुकीनं दाखवून दिलं.  आता पुन्हा विधानसभेचा कौल कुणाच्या हातात आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेची चावी शहरी मतदाराच्या हाती दिसत आहे. शहरातला मतदारच ठरवणार विधानसभेचा कौल, निवडणूक जिंकण्याचा नवा मंत्र, शहरांकडे चला ! , असाच दिसतोय.

Oct 14, 2014, 08:28 PM IST

नावात काय आहे ?, साम्य असलेले अनेक उमेदवार रिंगणात

 नावात काय आहे ? असं म्हटलं  जातं.. पण जर तुम्ही निवडणुकीला उभे असालं तर नावात खूप काही आहे. नामसाधर्म्यामुळं तुम्ही निवडणूकीत पराभूतही होऊ शकता. लोकसभा निवडणूकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे श्रीवर्धनमधून उभे होते.  त्यांच्याच नावाच्या एका अपक्ष उमेदवाराला दहा हजार मतं मिळाली आणि सुनील तटकरेंचा अवघ्या दोन हजार मतांनी पराभव झाला. त्यामुळं सारख्याच नावाच्या उमेदवारांनी निवडणुकीचं पारडं फिरुही शकतं.

Oct 14, 2014, 05:04 PM IST

प्रचार संपायच्या एक दिवस राज्यभर पैशाचा पाऊस

प्रचार संपायला एक दिवस शिल्लक असताना राज्यभर पैशाचा पाऊस पडलाय. शिरुरमध्ये पाच लाख, नाशिकमध्ये १२ लाख तर रामटेकमध्ये १० लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

Oct 12, 2014, 08:10 AM IST

भाजपकडून धार्मिक तेढ, सामाजिक ऐक्याला सुरुंग - पवार

भाजप धार्मिक तेढ निर्माण करत असून सामाजिक ऐक्याला सुरूंग लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

Sep 16, 2014, 09:29 PM IST

मुख्यमंत्री चव्हाण यांची कोणी केलेय कोंडी?

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील काँग्रसची निवडणुकीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. मात्र खुदद् पृथ्वीराज बाबांना कुठल्या मतदारससंघातून निवडणूक लढवणार याबाबत अद्याप चित्र स्पष्ट नाही. पृथ्वीराज चव्हाणांनी दक्षिण कराडमधून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र तिथे स्वपक्षाबरोबरच, मित्रपक्ष आणि विरोधकांनीही मुख्यमंत्र्यांची पूर्णपणे कोंडी केली आहे.

Sep 16, 2014, 08:30 PM IST